पंढरीतून आली आनंदाची बातमी, भीमा नदीवरील सर्वात मोठ्या पुलाचे काम पूर्ण; जाणून घ्या कधीपासून हाेणार वाहतूकीसाठी खुला

Bhima River Bridge Inaguration Will Be Before Ashadhi Wari : यंदा 17 जूलैला आषाढी एकादशीचा साेहळा साजरा हाेणार आहे. त्यापूर्वी भीमा नदीवरील पूलाचे लाेकार्पण हाेणार आहे.
bhima river bridge will be open before pandharpur ashadhi wari
bhima river bridge will be open before pandharpur ashadhi wari Saam Digital

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील पंढरपूर जवळच्या भीमानदीवर उभारण्यात आलेल्या सर्वात मोठ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. आषाढीवारी पूर्वी हा पुल वाहतूकीसाठी खुला केला जाणार आहे. हा पुल सुरू झाल्यानंतर पंढरपूर शहरातील वाहतूक कोंडीची प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असल्याचा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

पंढरपूर पासून पुढे मोहोळ पर्यंत पालखी मार्ग जोडण्यात आला आहे. या मार्गांवर कौठाळी ते गुरसाळे दरम्यान सुमारे 625 मीटर लांबीचा पूल बांधण्यात आला आहे. पूलाचे काम अवघ्या 30 महिन्यात पूर्ण करण्यात आले आहे.

bhima river bridge will be open before pandharpur ashadhi wari
Tuljapur : भाविकांनो, सावधान! तुळजापुरात बोगस पुजाऱ्यांचा सुळसुळाट, फसवणूक टाळण्यासाठी VIDEO पाहा

भीमानदीला महापूर आला तरी हा पूल वाहातुकीसाठी खूला राहिल इतक्या उंचीवर हा पूल उभारला आहे. या पुलामुळे पंढरपूर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

bhima river bridge will be open before pandharpur ashadhi wari
Ratnagiri Crime: “आरजू टेक्सोल” फसवणूक प्रकरणी 115 जणांचे जबाब नाेंदविले, 2 संचालकांना अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com