Ratnagiri Crime: “आरजू टेक्सोल” फसवणूक प्रकरणी 115 जणांचे जबाब नाेंदविले, 2 संचालकांना अटक

arju techsol company case : सन 2021 पासून रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसीत “आरजू टेक्सोल कंपनी” कार्यरत आहे. कच्चा माल देतो, पक्का माल बनवून द्या असे सांगून अनेकांची कंपनीने फसवणूक केली आहे अशी तक्रारी आहे.
two arrested in arju techsol company case near ratnagiri
two arrested in arju techsol company case near ratnagiri Saam Digital

रत्नागिरी जिल्ह्यातील “आरजू टेक्सोल कंपनी” फसवणूक प्रकरणात आणखी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे. प्रसाद शशिकांत फडके याला पाेलिसांनी आज अटक केली. सुमारे 800 हुन अधिक लोकांची 'आर्जु'कडून फसवणूक झाल्याची चर्चा आहे.

रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनूसार “आरजू टेक्सोल कंपनी” यांच्या माध्यमातून ज्या नागरिकांची फसवणूक झाली आहे त्यांच्या साक्षी नोंदविण्याचे काम सुरु आहे. पाेलिसांनी सुमारे 115 जणांचे जबाब नाेंदविले आहेत. ही प्रक्रिया तक्रारदारांसाठी सुलभ व्हावी यासाठी नियाेजन केले आहे. तक्रारदारास वेळ दिली जात आहे. त्या वेळेत त्यांनी हजर राहून जबाब द्यावा असेही कुलकर्णी यांनी नमूद केले.

two arrested in arju techsol company case near ratnagiri
काेल्हापूर: रागाच्या भरात मुलाकडून आईची हत्या, कारणंही आलं समाेर

आत्तापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेने दाेन संचालकांना अटक केली आहे. संजय गोविंद केळकर (वय 49, रा. तारवेवाडी, हातखंबा) आणि प्रसाद शशिकांत फडके (वय 34, रा. गावखडी) या दाेघांना अटक केली आहे. अन्य संशयितांचा पाेलिस शोध घेताहेत.

Edited By : Siddharth Latkar

two arrested in arju techsol company case near ratnagiri
Sangli Dcc Bank : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासक नेमा; अचानक राजू शेट्टींनी सरकारला का केली अशी मागणी? Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com