Ratnagiri Crime : काेकणातील श्रमिक सहकारी पतपेढीवर दराेडा, दीड कोटींचे सोने लंपास; श्वान पथक दाखल

वरिष्ठ पाेलिसांनी घटनास्थळाची पहाणी केल्यानंतर तपासा बाबत सूचना केल्या. यावेळी श्वान पथक बाेलावण्यात आले. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिस अधिक तपास करत आहे.
gold rs one and half crore looted from shramik sahakari patpedhi near rajapur ratnagiri
gold rs one and half crore looted from shramik sahakari patpedhi near rajapur ratnagiriSaam Digital

रत्नागिरी जिल्ह्यातील श्रमिक सहकारी पतपेढी मर्यादित साखर यांची मीठगवाणे येथील शाखेवर दरोडा पडला. या दराेड्यात सुमारे दीड कोटी रुपयांचे जवळपास 200 तोळे सोने लंपास झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत. (Maharashtra News)

राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील श्रमिक पतपेढीची शाखा अज्ञात चोरट्याने फोडल्याची घटना घडली असून सकाळी शाखा उघडण्यासाठी आलेल्या शिपायाच्या शाखेचा कडी कोंडा तोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याने संबंधितांना माहिती दिली. शाखा व्यवस्थापकाकडून नाटे सागरी पोलिस स्थानकात तात्काळ तक्रार दाखल करण्यात आली.

gold rs one and half crore looted from shramik sahakari patpedhi near rajapur ratnagiri
Kolhapur: काेल्हापूर जिल्ह्यात गव्यांची दहशत पुन्हा वाढली, राधानगरीसह आज-यात कारला धडक; दाेघे गंभीर जखमी

पाेलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान सागरी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपपोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड हे वरिष्ठ पाेलिसही घटनास्थळी दाखल झाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वरिष्ठ पाेलिसांनी घटनास्थळाची पहाणी केल्यानंतर तपासा बाबत सूचना केल्या. यावेळी श्वान पथक बाेलावण्यात आले. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिस अधिक तपास करत आहे.

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार श्रमिक सहकारी पतपेढी मर्यादित साखर यांची मीठगवाणे शाखेतील सोने ठेवण्याचे लॉकर फोडण्यात आले. त्यातील जवळपास 200 तोळे साेन्याची चाेरी झाली आहे. पैशाचे लाॅकर सुरक्षित आहे. श्री देव अंजनेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारा समोर ही शाखा आहे. येथे फारशी वर्दळ नसते याचाच फायदा घेऊन पतपेढी फोडल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

gold rs one and half crore looted from shramik sahakari patpedhi near rajapur ratnagiri
Olive Ridley Turtle Conservation: कोकणात कासव संवर्धन मोहिमेला तापमानवाढीचा फटका, 50 टक्के पिल्लांची संख्या घटली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com