काेल्हापूर: रागाच्या भरात मुलाकडून आईची हत्या, कारणंही आलं समाेर

Son Hits Mother In Farm Near Radhanagari : पोलिसांनी दिलेली माहिती अशी : सुतारकीचा माळ येथील शेतात काम करताना मुलगा, आई-वडील यांच्यात वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात मुलाने आईचा खून केला.
radhanagari police arrests son for hitting mother
radhanagari police arrests son for hitting motherSaam Digital

- रणजीत माजगावकर

काेल्हापूर जिल्ह्यात मुलाने आईची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना राधानगरी तालुक्यातील बारवाडी गावात घडली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मालुबाई श्रीपती मुसळे असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पाेलिसांनी संदीप मुसळे याला अटक केली आहे.

राधानगरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पेरणीच्या वादातून संदीप मुसळे याने त्याची आई मालुबाई हिचा डोक्यात खोरे मारून हत्या केली. या घटनेची माहिती कळताच ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार यांनी घटनास्थळाची पाहणी करुन कर्मचा-यांना सूचना केल्या.

radhanagari police arrests son for hitting mother
Shivrajyabhishek Sohala 2024 : शिवराज्याभिषेक सोहळ्याला आचारसंहितेचा अडसर? सरकारने मार्ग काढावा : संभाजीराजे

दरम्यान संदीप मुसळे याला एक मूलगा व एक मूलगी आहे. त्याला दारुचे व्यसन असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये हाेती. राधानगरीचे पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांच्यासह पथकाने पंचनामा करुन महिलेचा मृतदेह सोळांकूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्‍छेदनासाठी पाठविला. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.

Edited By : Siddharth Latkar

radhanagari police arrests son for hitting mother
Satara: दुहेरी हत्याकांडाने सातारा जिल्हा हादरला, बहिण भावाचा मृत्यू, निंभाेरेत खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com