Sangli Crime: गर्भपात प्रकरण आलं अंगलट, हातकणंगलेतील महिलेचा मृत्यू; चिकाेडी पाेलिसांपुढं तपासाचे आव्हान

Hatkanangale Women Death Case : या प्रकरणाचा तपास आता चिकाेडी पाेलिस करणार आहेत. त्यानंतरच संशयित आराेपी काेण आहेत. त्यांनी कशासाठी हा सारा प्रकार केला ते समजणार आहे.
sangli police arrests three in hatkanangale women death case
sangli police arrests three in hatkanangale women death case Saam Digital

हातकणंगले येथील महिलेच्या मृतदेहाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न नातेवाईकांच्या अंगलट आले आहेत. मिरज तालुक्यातील माहेरवाशिण असलेल्या महिलेचा कर्नाटक येथे गर्भपात करताना मृत्यू झाला. त्यानंतर तेथे तिच्या मृतदेहाचे प्रमाणपत्र देण्यास संबंधितांनी नकार दिल्याने नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह सांगली शहरात आणला. याची कुणकुण पाेलिसांना लागताच त्यांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. हा गुन्हा चिकाेडी पाेलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

या प्रकाराबाबतची माहिती अशी : सैन्य दलात कार्यरत असलेल्या जवानाच्या पत्नीचा तिच्या नातेवाईकांनी तिची गर्भलिंग चाचणी केली. त्यानंतर गर्भपात करण्यासाठी तिला चिकाेडी येथील महालिंगपूर येथे नेले. गाठले. तिथे एका दवाखान्यात महिलेवर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर तिची प्रकृती चिंताजनक बनली. तिचा त्याच दवाखान्यात मृत्यू झाला. दरम्यान तिचे मृत्यू प्रमाणपत्र देण्यास दवाखान्याने नकार दिला. त्यामुऴे नातेवाईकांची अडचण झाली.

sangli police arrests three in hatkanangale women death case
Mahavitran वर शहरापूर ग्रामस्थांचा राेष, 8 दिवस झाले गावात लाईट नाही, DP कधी बसवणार?

दरम्यान नातेवाईकांनी मृतदेह सांगलीत आणला. सांगलीत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केला. त्यासाठी मिरज तालुक्यातील एक डॉक्टरची त्यांनी मदत घेतली. या प्रकाराची माहिती सांगली पाेलिसांना समजताच त्यांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शासकीय रुग्णालयात नेलेा. हे प्रकरण चिकोडी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

sangli police arrests three in hatkanangale women death case
Beed Drought : बीड जिल्ह्यात दुष्काळाचे तीव्र चटके; 399 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com