Mahavitran वर शहरापूर ग्रामस्थांचा राेष, 8 दिवस झाले गावात लाईट नाही, DP कधी बसवणार?

Mahavitran Nanded News : वीज पुरवठा खंडित असल्याने शहापूरच्या ग्रामस्थांना शेजारच्या गावातून पाणी आणावं लागतंय. रात्र देखील संपुर्णत: अंधारात काढावी लागत आहे.
shahapur villagers demands electric dp
shahapur villagers demands electric dpSaam Digital

- संजय सूर्यवंशी

महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे नांदेड जिल्ह्यातील शहापूर या गावात गेल्या आठ दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत असल्याचा आराेप ग्रामस्थांनी केला आहे. महावितरण कंपनीने गावात डीपी बसवून द्यावा अन्यथा आत्मदहन आंदाेलन करु असा इशाला ग्रामस्थांनी प्रशासनास दिला आहे.

नांदेड जिल्ह्यात तापमानाने उंच्चाक गाठला आहे.वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. अशा वाढत्या तापमानात दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शहापूर गावकऱ्यांवर आली आहे. ही वेळ आणली आहे महावितरण कंपनीने.

shahapur villagers demands electric dp
Beed Drought : बीड जिल्ह्यात दुष्काळाचे तीव्र चटके; 399 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

मागील आठ दिवसा पासून शहापूर गावाचा वीज पुरवठा बंद आहे. गावाला आणि शेतीला वीज पुरवठा करणारे विद्युत डीपी जाळले आहेत. त्यामुळे शहापूर गावाला अनेक समस्यांना तोंड द्याव लागत आहे.

वीज पुरवठा खंडित असल्याने शेजारच्या गावातून पाणी आणावं लागतंय. रात्र देखील संपुर्णत: अंधारात काढावी लागत आहे. महावितरण कार्यालयाचे दररोज खेटे मारून या गावातील नागरिक थकले. परंतु अद्याप महावितरण कंपनीने या गावात डीपी बसवून दिला नाही. परिणामी गावकऱ्यांनी आता आत्मदहनाचा इशारा प्रशासनास दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

shahapur villagers demands electric dp
Amravati Hit And Run Case: पुण्यानंतर अमरावतीतही हिट अँड रन, घटना सीसीटीव्हीत कैद; युवक पाेलिसांना का सापडेनात? नातेवाईकांचा सवाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com