Amravati Hit And Run Case: पुण्यानंतर अमरावतीतही हिट अँड रन, घटना सीसीटीव्हीत कैद; युवक पाेलिसांना का सापडेनात? नातेवाईकांचा सवाल

Amravati Crime News : ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. या घटनेची तक्रार गाडगे नगर पोलिस ठाण्यात देण्यात आलेली आहे. पाेलिसांनी लवकरात लवकर तपास करावा अशी मागणी जाेर धरु लागली आहे.
one died in amravati hit and run case
one died in amravati hit and run caseSaam Digital

- अमर घटारे

पुण्यातील कार अपघाताची घटना संपूर्ण देशभर गाजत असतानाच अमरावती शहरातील गाडगे नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संमती कॉलनी परिसरात एका भरधाव कार चालकाने भर दिवसा एका व्यक्तीला जोरदार धडक देऊन पलायन केल्याचे समाेर आले आहे. या घटनेतील दुचाकीस्वाराचा नुकताच मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनेस 23 दिवस झाले तरी अद्याप पाेलिसांना कार चालकाचा शाेध लागला नसल्याची माहिती मृताच्या नातेवाईकांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

अमरावती शहरातील किशोर नगर येथील रहिवासी भीमसेन वाहने हे कठोरा रोडवरील संमती कॉलनीतून आपल्या दुचाकी वाहनाने जात असताना एका भरधाव कारने त्यांना उडविले. या अपघातानंतर कारमधील युवक कारच्या बाहेर आले. त्यांनी दुचाकीस्वाराला रस्त्यावरच साेडून तेथून पलायन केले.

one died in amravati hit and run case
Success Story: दिव्यांग 'माला' एमपीएससीत चमकली, शंकरबाबांच्या लेकीवर काैतुकाचा वर्षाव

याबाबत दुचाकीस्वार भीमसेन यांचा मूलगा रोशन वाहने यांनी साम टीव्हीशी बाेलताना माझ्या वडिलांचा अपघात झाल्यानंतर कार चालकाने त्यांना रुग्णालयात दाखल न करता तेथून पळ काढला हे आम्हांला तेथील रहिवाशांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. या अपघाताची माहिती नागरिकांकडून आम्हांला मिळाली. माझ्या वडिलांना नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा 16 मे रोजी मृत्यू झाला.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. या घटनेची तक्रार गाडगे नगर पोलिस ठाण्यात देण्यात आलेली आहे. आज 23 दिवसानंतरही पोलिसांना अद्याप आरोपींना शाेधता आलेली नाही. त्या परिसरात खूप सीसीटीव्ही कॅमेरा आहेत. ते तपासून आराेपी सापडू शकतील. पाेलिसांनी तात्काळ आराेपींना अटक करावी अशी मागणी वाहने कुटुंबीयांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

one died in amravati hit and run case
Subodh Savji: मुख्य निवडणूक आयुक्तांना जिवे मारण्याची धमकी, सुबाेध सावजींवर गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com