Success Story: दिव्यांग 'माला' एमपीएससीत चमकली, शंकरबाबांच्या लेकीवर काैतुकाचा वर्षाव

Mala Papalkar Passed MPSC : यापूर्वी माला पापडकर हिने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठामध्ये पदवी परीक्षेमध्ये प्रथम श्रेणी मध्ये 2018 मध्ये उर्त्तीण होवुन इतिहास घडविला.
success story of mala papadkar orphan and blind cracked mpsc exam
success story of mala papadkar orphan and blind cracked mpsc examSaam Digital

- अमर घटारे

महाराष्ट्र नव्हे तर संपुर्ण देशात दिव्यांगाच्या पुनर्वसनाच्या इतिहासामधील एकमेव घटना सुर्वणाक्षरांनी लिहली जाईल अशी नुकतीच घडली आहे. दिव्यांग असलेली माला शंकरबाबा पापळकर हिने आपल्या बुध्दीमत्तेच्या जाेरावर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा उर्त्तीण हाेत इतिहास घडविला आहे. तिचे सर्व जिल्हाभर कौतूक होत असून आमरवतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी देखील तिचे काैतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. (Maharashtra News)

20 वर्षापूर्वी दोन्ही डोळयांनी अंध असलेली माला जळगाव येथे पोलिसांना रेल्वे स्टेशनवर बेवारस स्थितीत सापडली. पोलिसांनी तिच्या आई वडिलांचा नातेवाईकांचा शोध घेतला परंतु काही केल्या शोध लागला नाही. अखेर तिला जळगाव येथील रिमांड होम मध्ये दाखल करण्यात आले.

success story of mala papadkar orphan and blind cracked mpsc exam
Water Crisis In Marathwada: मराठवाडा बनला टँकर वाडा; 1710 गावांना 1803 टँकरने पाणी पुरवठा

त्यानंतर तिला बालकल्याण समिती जळगाव यांच्या आदेशान्वये अमरावती जिल्ह्यतील वझ्झर येथील स्व.अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहाचे संचालक शंकरबाबा पापळकर यांच्या ताब्यात देण्यात आले. शंकरबाबांनी तिचे पालकत्व स्विकारले.

परतवाडा येथील यशवंत अंध विद्यालयात 4 थी पर्यंतचे शिक्षण, आय एस गर्ल्स हायस्कुल परतवाडा येथुन बारावी पर्यंतचे शिक्षण दिले. बारावीत माला प्रथम श्रेणीमध्ये उर्तीण झाली. त्यानंतर तिला अमरावती येथील नामांकीत विदर्भ महाविद्यालय येथे पाठविण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पदवीधर आणि पदव्युत्तर या दोन्ही उच्च् शिक्षणा करीता दर्यापुरचे प्रा.प्रकाश टोपले पाटील यांनी तिचे पालकत्व स्विकारुन तिची संपुर्ण व्यवस्था केली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठामधुन पदवि परीक्षेमध्ये प्रथम श्रेणी मध्ये 2018 मध्ये उर्त्तीण होवुन इतिहास घडविला.

त्या नंतर मालाच्या पुढील पुनर्वसनाचे काय ? हा गंभीर प्रश्न सतत बाबांना भेडसावत होता. दैव योगाने अमरावती येथील युनिक ॲकेडमिचे संचालक अमोल पाटील यांनी स्वत:हुन बाबांकडे जावुन मालाच्या एमपीएससी परीक्षेच्या तयारीची जबाबदारी स्वीकारली. तहसीलदार आणि इतरही पदाच्या परीक्षा तिने दिल्या. परंतु त्यात यश आले नाही.

त्यानंतर तिने जिद्दीने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची लिपीक (टंकलेख्न) परीक्षा दिली. त्यात ती उत्तीर्ण झाली. या यशाने तिचे सर्वत्र काैतुक हाेते आहे. तिचे आमरवतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी काैतुक करुन शुभेच्छा दिल्या.

Edited By : Siddharth Latkar

success story of mala papadkar orphan and blind cracked mpsc exam
Sindkhed Raja : सिंदखेड राजामध्ये सापडलं 13 व्या शतकातील शिवमंदिर, पुरातत्त्व अधिकाऱ्यांची पाहणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com