Sindkhed Raja : सिंदखेड राजामध्ये सापडलं 13 व्या शतकातील शिवमंदिर, पुरातत्त्व अधिकाऱ्यांची पाहणी

या ठिकाणी अजून उत्खनन केले जाणार असून, उत्खनन पूर्ण झाल्यानंतरच या मंदिराची गुपितं समोर येऊ शकतात असेही अधिकाऱ्यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.
yadav kalin mandir found in sindkhed raja near buldhana
yadav kalin mandir found in sindkhed raja near buldhanaSaam Digital

सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक अशा राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना उत्खनन करताना तेराव्या शतकातील यादवकालीनपूर्व शिवमंदिर या समाधीसमोर आढळले. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्याने याची नुकतीच पाहणी केली. (Maharashtra News)

सोळाव्या शतकातील राजे लखोजीराव जाधव यांच्यासह 3 मुलं तसेच नातु यांच्या समाधीचे जतन व संवर्धनाचे कामे करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभाग उत्खनन करत आहे. याठिकाणी उत्खनन करताना त्यांना हे यादवकालीन शिवमंदिर उत्खनन करताना आढळले.

yadav kalin mandir found in sindkhed raja near buldhana
Water Crisis : लातूरकर चिंतेत, मांजरा धरणात अल्प पाणीसाठा, सोलापुरातील 143 गावांसह 991 वाड्या- वस्त्यांवर 200 टँकर्सने पाणी पुरवठा

या मंदिरामध्ये महादेवाची मोठी पिंड व्दोर शिला असून हे मंदिर मोठ्या दगडाने बांधलेले आहे. या मंदिराखाली दगडी फरशी सुद्धा टाकलेली आहे. या ठिकाणी अजून उत्खनन केले जाणार असून, उत्खनन पूर्ण झाल्यानंतरच या मंदिराची गुपितं समोर येऊ शकतात असेही अधिकाऱ्यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

yadav kalin mandir found in sindkhed raja near buldhana
Bhandardara Fireflies Festival 2024: काजव्यांची चमचम पाहण्यास भंडारद-याला येणार आहात? जाणून घ्या नियम व अटी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com