Water Crisis : लातूरकर चिंतेत, मांजरा धरणात अल्प पाणीसाठा, सोलापुरातील 143 गावांसह 991 वाड्या- वस्त्यांवर 200 टँकर्सने पाणी पुरवठा

मागील वर्षी समाधानकारक पाऊस न पडल्याने उजनीसह अन्य धरणाच्या पाणीपातळी खालावली आहे. याशिवाय विहिरी कोरड्या पडल्याने अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
water crisis in solapur 200 tanker supplies water in villages
water crisis in solapur 200 tanker supplies water in villagesSaam Digital

- विश्वभूषण लिमये / संदीप भाेसले

सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यातील १४३ गावांसह ९९१ वाड्या- वस्त्यांवरील ३ लाख ९८ हजार ६८४ बाधित लोकसंख्येला २०० टँकरने पाणीपुरवठा होत असल्याची माहिती सामोर आली आहे. दरम्यान लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणामध्ये आता केवळ 0.86 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. (Maharashtra News)

दरम्यान मागील वर्षी समाधानकारक पाऊस न पडल्याने उजनीसह अन्य धरणाच्या पाणीपातळी खालावली आहे. याशिवाय विहिरी कोरड्या पडल्याने अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

water crisis in solapur 200 tanker supplies water in villages
Shivrajyabhishek Sohala 2024 : शिवराज्याभिषेक सोहळ्याला आचारसंहितेचा अडसर? सरकारने मार्ग काढावा : संभाजीराजे

पाणीच मिळत नसल्याने नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने अनेक गावांना पाण्याची कमतरता भासत आहे. दरम्यान सध्या 200 टॅंकर्सच्या माध्यमातून नागरिकांना पाणी पूरविले जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लातूरच्या मांजरा धरणात अल्प प्रमाणात पाणी

लातूर जिल्ह्यात देखील दिवसेंदिवस पाणीटंचाईची दाहकता वाढू लागली आहे. संपूर्ण लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणामध्ये आता केवळ 0.86 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

दरम्यान याच मांजरा धरणातून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई ,केज,धारूर तसेच धाराशिव जिल्ह्यातील कळंब, शिराढोण यासह लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र आता या धरणात मृत अवस्थेत पाणीसाठा असल्याने मांजरा धरणावर अवलंबून असणाऱ्या शहरांची आणि गावांची चिंता वाढली आहे.

Edited By : Siddharth Latkar

water crisis in solapur 200 tanker supplies water in villages
50 हजाराची लाच घेतल्याने शिक्षणाधिका-यास अटक, जाणून घ्या प्रकरण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com