पंढरपूर कुर्डूवाडी मार्गावर भीषण अपघात, कपड्यांनी भरलेला ट्रक जळून खाक; 80 लाखांचे नुकसान

Pandharpur Accident News : या अपघातामुळे पंढरपूर कुर्डूवाडी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक आता सुरळीत केली.
clothes loaded truck catches fire near pandharpur
clothes loaded truck catches fire near pandharpurSaam Digital

पंढरपूर जवळ मालवाहतूक ट्रक आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये कपड्याने भरलेला ट्रक जळून खाक झाला आहे. तसेच ट्रेलर देखील जळाला आहे. यामुळे लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे. (Maharashtra News)

हा अपघात आज पहाटेच्या सुमारास पंढरपूर पासून जवळ असलेल्या आढीव गावाजवळ घडला आहे. अपघातानंतर स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आग मोठी असल्याने कपड्याने भरलेला ट्रक जळून खाक झाला आहे.

clothes loaded truck catches fire near pandharpur
Dharashiv: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

यामध्ये सुमारे 70 ते 80 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातामुळे पंढरपूर कुर्डूवाडी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक आता सुरळीत केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

clothes loaded truck catches fire near pandharpur
Amravati Crime : अमरावतीत गुंतवणुकीच्‍या नावाखाली ऑनलाईन फसवणुक, 10 अटकेत; 31 लाख 35 हजार लाटले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com