पंढरपूर : जीपचा टायर फुटून भीषण अपघात; तीन महिला ठार, नऊ गंभीर जखमी

Pandharpur Accident: या अपघातामधील जखमी महिलांना मिरज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद सांगोला पोलिस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास सांगाेला पाेलिस करीत आहेत.
three passed away from car in a road accident near sangola
three passed away from car in a road accident near sangolaSaam Digital

सांगोला- जत मार्गावर सोनंद गावाजवळ एका जीपचा टायर फुटुन झालेल्या अपघातात तीन महिला मजूरांचा मृत्यू झाला. या महिला कर्नाटकातील अथणी येथील असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. या अपघातामधील अन्य जखमी महिलांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Maharashtra News)

या अपघाताबाबत सांगोला पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : कर्नाटकातील अथणी येथील मजूर महिला पंढरपूर तालुक्यात द्राक्ष बागेतील कामांसाठी जीप मधून निघाल्या हाेत्या. या जीपचा सोनंद गावाजवळ टायर फुटल्याने अपघात झाला.

three passed away from car in a road accident near sangola
मतदान होताच नीरेचे पाणी बंद, पंढरपूरसह माळशिरसचे शेतकरी हतबल; रणजितसिंह मोहिते पाटलांनी घातलं लक्ष, साेमवारी...

या अपघातात तीन महिलांचा जागेवर मृत्यू झाला तर नऊ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना मिरज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद सांगोला पोलिस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास सांगाेला पाेलिस करीत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

three passed away from car in a road accident near sangola
Navneet Rana Controversial Statement: “काँग्रेसला मतदान करणं म्हणजे…”, नवनीत राणांवर गुन्हा दाखल करा; अमरावतीत काॅंग्रेस आक्रमक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com