Dharashiv: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

Dhule Solapur Highway : धुळे - सोलापूर महामार्गावर चोराखळी गावाजवळील एका हॉटेल नजीक 5 जण संशयित आढळले. पाेलिसांनी त्यांची चाैकशी सुरु करताच ते घाबरुन पळू लागले.
dharashiv lcb arrests three at dhule solapur highway
dharashiv lcb arrests three at dhule solapur highwaySaam Digital

- बालाजी सुरवसे

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चोराखळी गावाजवळ दरोड्याच्या तयारीतील टाेळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. हे संशयित आराेपी मोक्का गुन्ह्यात तडीपार असून तिघांना सशस्त्र अटक केल्याची माहिती धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांनी दिली. (Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पुणे जिल्ह्यातील मोक्का टोळीचा प्रमुख विनोद शिवाजी जामदरे व त्याचे इतर साथीदार येरमाळा परीसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येरमाळा परिसरात रात्रगस्त सुरू केली होती.

dharashiv lcb arrests three at dhule solapur highway
Success Story: दिव्यांग 'माला' एमपीएससीत चमकली, शंकरबाबांच्या लेकीवर काैतुकाचा वर्षाव

त्यानुसार धुळे - सोलापूर महामार्गावर चोराखळी गावाजवळील एका हॉटेल नजीक 5 जण संशयित आढळले. पोलिसांनी त्यांची चाैकशी सुरु करताच त्यांनी पळुन जाण्याचा प्रयत्न केला. त्यात दाेघे यशस्वी झाले. पोलिसांनी पाठलाग करुन तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी पिस्तुल,एक कत्ती,एक कटावणी ताब्यात घेण्यात आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

dharashiv lcb arrests three at dhule solapur highway
POP Ganpati Murti: पीओपी गणेशमूर्तीवर बंदी, 130 कारखान्यांना नाेटीस; नगर मनपाच्या विरोधात जनआंदोलन उभारणार : गणेश मूर्तीकारांची भूमिका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com