Dharashiv: वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना मागण्यांवर ठाम, बेमुदत उपाेषण सुरुच ठेवणार

MSEDCL Contractual Workers Andolan: अनेक वर्ष अनुभव असणाऱ्या कामगारांना कामावरुन काढुन जे जास्त पैसे देतील त्यांना ऑर्डर दिली जात असल्याचा आरोप देखील कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
veej kantrati kamgaar sanghatana andolan in dharashiv
veej kantrati kamgaar sanghatana andolan in dharashiv Saam Digital
Published On

- बालाजी सुरवसे

महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटनेने विविध मागण्यांसाठी आजपासून धाराशिव येथे बेमुदत उपोषणास प्रारंभ केला आहे. हे आंदाेलन धाराशिवच्या अधिक्षक अभियंता कार्यालयासमोर करण्यात येत आहे. यावेळी आंदाेलकांनी मागण्यांबाबतच्या घाेषणा देत परिसर दणाणून साेडला. (Maharashtra News)

नवीन टेंडर प्रक्रिया पुर्ण झाली असेल तर सर्व कामगारांना तात्काळ नियुक्ती पत्र द्यावे, जे कामगार सध्या कामावर आहेत त्यांना त्याच ठिकाणचे नियुक्ती आदेश द्यावेत, थकीत वेतन द्यावे यासह विविध मागण्यांसाठी हे बेमदुत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर वीज कंत्राटी कामगार सहभागी झाले आहेत.

veej kantrati kamgaar sanghatana andolan in dharashiv
नवी मुंबई : नववी शिकलेल्या युवकाचा बनावट नोटांचा छापखाना, पाेलिसांच्या धाडीत 2 लाखांच्या नाेटा जप्त

दरम्यान जुने 10 ते 15 वर्षाचा अनुभव असणाऱ्या कामगारांना कामावरुन काढुन टाकण्यात येत आहे. जे जास्त पैसे देतील त्यांना नविन ऑर्डर दिली जात असल्याचा आरोप देखील कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. जाेपर्यंत मागण्या मान्य हाेत नाहीत ताेपर्यंत आंदाेलन सुरु राहणार असल्याची माहिती वीज कंत्राटी कामगार संघटनेचे पदाधिकारी सुशिल उपळकर यांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

veej kantrati kamgaar sanghatana andolan in dharashiv
Tuljapur Mandir News: तुळजाभवानी संस्थांकडून भेदभाव? पाळीकर पुजा-यांचे जिल्हाधिका-यांना गा-हाणे; नेमकं घडलय काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com