Tuljapur Mandir News: तुळजाभवानी संस्थांकडून भेदभाव? पाळीकर पुजा-यांचे जिल्हाधिका-यांना गा-हाणे; नेमकं घडलय काय?

Tuljapur News: महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यातील भाविक तुळजापूर येथे मुक्कामी येऊ लागले आहेत. त्यामुळे तुळजापूर सध्या भाविकांची मोठी रेलचेल पाहायला मिळत आहे.
pujari from tuljapur demands permission for photography in tuljabhavani mandir
pujari from tuljapur demands permission for photography in tuljabhavani mandir Saam Digital

- बालाजी सुरवसे

तुळजाभवानी मातेच्या मंदीरात सण उत्सवासह सेवेसाठी गेलेल्या पाळीकर पुजाऱ्यांना गाभाऱ्यात फोटो काढण्याची परवानगी द्यावी अशी मागणी पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपिन शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान शाळा, महाविद्यालयांना उन्हाळी सुट्या लागल्याने राज्यासह परराज्यातील भाविकांची तुऴजापूर येथे गर्दी हाेऊ लागली आहे. (Maharashtra News)

pujari from tuljapur demands permission for photography in tuljabhavani mandir
Ranjitsinh Naik Nimbalkar : कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लावाल तर मुळावर घाव घालू; रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा मोहिते पाटलांना इशारा

तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात मंदीर संस्थांन भेदभाव करत असल्याचा आरोप पुजारी मंडळ करु लागला आहे. तुळजाभवानी मातेच्या मंदीरात अधिकृत पुजाऱ्यांना थेट गाभाऱ्यात मातेची सेवा बजावण्याचा मान परंपरेने चालत आला आहे.

तुळजाभवानी मंदीरात राजकीय नेते, मंत्री, आमदार, वरिष्ठ अधिकारी आदी व्हीआयपीसह पुजारी थेट गाभाऱ्यात फोटो, व्हिडिओ काढतात. दूसरीकडे मंदीर संस्थांचे अधिकारी कर्मचारी पाळीकर पुजाऱ्यांना फोटो काढु देत नाहीत. त्यासाठी मनाई करतात. त्यामुळे पाळीकर पुजाऱ्यांना देखील फोटोसाठी परवानगी द्यावी अशी मागणी जाेर धरु लागली आहे.

pujari from tuljapur demands permission for photography in tuljabhavani mandir
Pune Traffic Diversion: पुणेकरांनाे! सिमला चौकाजवळ उद्यापासून वाहतूकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

भाविकांची अलाेट गर्दी

दरम्यान महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी गेल्या चार ते पाच दिवसांपासून भाविकांची मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे. शाळा, महाविद्यालयांना लागलेल्या सुट्यांमुळे तुळजापूरात भाविकांची संख्या वाढू लागल्याचे चित्र आहे. भाविकांच्या मांदियाळीमुळे मंदीर परीसर फुलुन गेला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com