Pune Traffic Diversion: पुणेकरांनाे! सिमला चौकाजवळ उद्यापासून वाहतूकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार वीर चाफेकर चौक ते न. ता. वाडी के. बी. जोशी मार्ग चौक ते सिमला ऑफिस चौक (बस स्थानक मार्ग) सर्व वाहनांसाठी एकेरी मार्ग करण्यात आला आहे.
pune traffic diverted at shimla office chowk for metro work from tomorrow
pune traffic diverted at shimla office chowk for metro work from tomorrowSaam Digital
Published On

- सचिन जाधव

पुणे शहरातील सिमला ऑफिस चौकाजवळ मेट्रो स्टेशनच्या गर्डर लाँचिंग आणि पिलरचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिमला ऑफिस चौक आणि परिसरातील वाहतुकीत उद्यापासून (शु्क्रवार, ता. 17 मे) बदल करण्यात येत असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त यांनी साम टीव्हीला दिली.(Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार वीर चाफेकर चौक ते न. ता. वाडी के. बी. जोशी मार्ग चौक ते सिमला ऑफिस चौक (बस स्थानक मार्ग) सर्व वाहनांसाठी एकेरी मार्ग करण्यात आला आहे. वीर चाफेकर उड्डाणपुलावरून सिमला ऑफिस चौकाकडे प्रवेश बंद राहणार आहे.

पर्यायी मार्ग

वीर चाफेकर उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूकडील सेवा रस्त्यावरून चाफेकर चौक डावीकडे वळून न.ता. वाडी - उजवीकडे वळण घेउन सिमला ऑफिस चौकाकडे जाता येईल.

फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरून वीर चाफेकर चौकातून सिमला ऑफिस चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग : चाफेकर चौक - सरळ न.ता. वाडी चौक उजवीकडे वळून सिमला ऑफिस चौक. न. ता. वाडी चौक ते वीर चाफेकर चौक प्रवेश बंद राहील.

pune traffic diverted at shimla office chowk for metro work from tomorrow
Panchganga River: पंचगंगेच्या प्रदूषणावरुन नागरिकांत संताप, महामंडळाचे दुर्लक्ष हजारो मासे मृत्यूमुखी

पर्यायी मार्ग

न.ता.वाडी चौकातून डावीकडे वळून सरळ सिमला ऑफिस चौक- उजवीकडे वळून चाफेकर चौक.

स. गो. बर्वे चौकाकडून सिमला ऑफिस चौकातून शिवाजीनगर रेल्वे स्टेशनकडे प्रवेश बंद राहील.

वीर चाफेकर चौक ते न. ता. वाडी. चौक ते सिमला ऑफिस रस्त्यावर सर्व वाहनांना नो पार्किंग करण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

pune traffic diverted at shimla office chowk for metro work from tomorrow
50 हजाराची लाच घेतल्याने शिक्षणाधिका-यास अटक, जाणून घ्या प्रकरण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com