POP Ganpati Murti: पीओपी गणेशमूर्तीवर बंदी, 130 कारखान्यांना नाेटीस; नगर मनपाच्या विरोधात जनआंदोलन उभारणार : गणेश मूर्तीकारांची भूमिका

Ahmednagar News in Marathi: या निर्णयावर आज अहमदनगर मनपात गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांनी मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली.
POP Ganpati Murti: पीओपी गणेशमूर्तीवर बंदी, 130 कारखान्यांना नाेटीस; नगर मनपाच्या विरोधात जनआंदोलन उभारणार : गणेश मूर्तीकारांची भूमिका
Ganesh Utsav 2024 News: Ganesh Murtikar Will Organize A Mass Movement Against The Ahmednagar Municipal Corporation As They Bans Pop Ganesh IdolsSaam Digital

- सुशील थोरात

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मुर्ती तयार न करता पर्यावरण पूरक मूर्ती तयार कराव्यात. तीन दिवसांच्या आत गणेश मूर्ती बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पीओपी साहित्याची विल्हेवाट लावावी. पीओपी साहित्य अथवा साठा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा मनपाने गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांना दिला आहे. दरम्यान या निर्णयामुळे गणपती मूर्ती बनवणारे कारखानदार अडचणीत आले आहेत. शासनाच्या आदेशामुळे हजारो कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

POP Ganpati Murti: पीओपी गणेशमूर्तीवर बंदी, 130 कारखान्यांना नाेटीस; नगर मनपाच्या विरोधात जनआंदोलन उभारणार : गणेश मूर्तीकारांची भूमिका
Sinhagad Fort Pune: सिंहगड किल्ल्याचा घाट रस्ता आजपासून राहणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

नगर महापालिकेने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती तयार करणाऱ्या 130 कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार काेणत्या प्रकारच्या गणेशमूर्ती हव्यात याबाबत नोटीस काढली आहे. यामध्ये नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार फौजदारी कारवाईचा इशारा मनपाने गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांना दिला आहे.

या निर्णयावर आज अहमदनगर मनपात गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांनी मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. गुजरात न्यायालयाचा निकाल, औरंगाबाद खंडपीठाचा निकाल आणि मंत्री दीपक केसरकर यांनी गेल्यावर्षी विधानसभेत पीओपी गणेश मूर्तीला कोणतीही बंदी नाही या केलेल्या निवेदनाचा संदर्भ देत गणेश मूर्तीकारांनी आपले म्हणणे मांडले.

मनपा प्रशासन भूमिकेवर ठाम

परंतु प्रशासन त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. आजच्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. केंद्रीय प्रदूषण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या सूचनेनुसार आम्ही संबंधितांना नोटीस बजावल्या आहेत. प्रदूषण मंडळाकडून ज्या सूचना देण्यात आल्यात त्याचे सर्व कारखानदारांनी पालन करावे असं आयुक्त पंकज जावळे यांनी स्पष्ट केले.

गणेश मूर्तीकार आंदाेलनाच्या पावित्र्यात

दरम्यान मनपाच्या या निर्णयाविरोधात लवकरच जनआंदोलन उभा केलं जाईल अशी भूमिका मूर्तीकारांनी घेतली आहे.

Edited By : Siddharth Latkar

POP Ganpati Murti: पीओपी गणेशमूर्तीवर बंदी, 130 कारखान्यांना नाेटीस; नगर मनपाच्या विरोधात जनआंदोलन उभारणार : गणेश मूर्तीकारांची भूमिका
Sindkhed Raja : सिंदखेड राजामध्ये सापडलं 13 व्या शतकातील शिवमंदिर, पुरातत्त्व अधिकाऱ्यांची पाहणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com