Amravati Crime : अमरावतीत गुंतवणुकीच्‍या नावाखाली ऑनलाईन फसवणुक, 10 अटकेत; 31 लाख 35 हजार लाटले

Amravati Crime : या गुन्हा तपासादरम्यान पोलिसांनी सर्व आरोपींचे मोबाईल कॉल डिटेल्स गोळा केले. कॉल्सद्वारे ते एकमेकांशी संवाद साधत होते हे पाेलिसांच्या लक्षात आले.
amravati police arrests ten in fake stock market investment case
amravati police arrests ten in fake stock market investment caseSaam Digital
Published On

- अमर घटारे

अमरावती येथे शेअर मार्केटच्या नावावर 31 लाख 35 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणुक केल्या प्रकरणी पाेलिसांनी दहा संशयित आरोपींना अटक केली आहे. आशिष बोबडे यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई केल्याची माहिती पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली. (Maharashtra News)

पोलिस अधीक्षक विशाल आनंद म्हणाले लवकर श्रीमंत होण्याच्या नादात अमरावती जिल्ह्यतील परतवाडा येथील आशिष बोबडे यांना काही लोकांनी शेअर बाजारात नेले. पैसे कमावण्यासाठी समाज माध्यमातील एका स्टॉक मार्केटच्या ग्रुपमध्ये सामील केले.

amravati police arrests ten in fake stock market investment case
Nagpur Crime : जुन्या वादातून युवा कॅबचालकाचा खून, दाेघांवर गुन्हा दाखल

या ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून बोबडे यांनी आपले खाते तयार केले. त्यात 31 लाख 35 हजार जमा करून शेअर्स खरेदी केले. यानंतर बोबडे यांनी गरजेनुसार पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता परंतु वेबसाइट बंद झाली. यानंतर संबंधित लोकांशी संपर्क साधला असता त्यांनी आपले सर्व नंबर बंद असल्याचे सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बाेबडे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी परतवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून (कलम 417, 420, 473 नुसार) गुन्हा दाखल केला. या गुन्हा तपासादरम्यान पोलिसांनी सर्व आरोपींचे मोबाईल कॉल डिटेल्स गोळा केले. कॉल्सद्वारे ते एकमेकांशी संवाद साधत होते.

दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवले गेले. या बँक खात्यांची साखळी जोडून ​​आरोपींनी छत्तीसगड राज्यातून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवले. यानंतर पोलिसांनी कारवाई करत सर्व दहा आरोपींना अटक केल्याचे विशाल आनंद यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

amravati police arrests ten in fake stock market investment case
Mumbai Goa Highway Traffic Jam: जाणवली ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक राेखली, वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com