Mumbai Goa Highway Traffic Jam: जाणवली ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक राेखली, वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा

Kankavali Rasta Roko : जाणवली येथील ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता पाेलिसांनी संयमाची भूमिका घेतली. ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
villagers rasta roko at janavali kankavli traffic jam on mumbai goa highway
villagers rasta roko at janavali kankavli traffic jam on mumbai goa highwaySaam Digital

- विनायक वंजारे

मुंबई गोवा महामार्गावर कणकवली जाणवली येथे आज (शनिवार) दुपारच्या सुमारास अचानक ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदाेलन छेडले. यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. पाेलिस घटनास्थळी दाखल झाले असून आंदाेलकांची समजूत काढत आहेत. (Maharashtra News)

कणकवली येथील जाणवली येथील एका ग्रामस्थाला काल एका अज्ञात वाहनाने ठोकरले. त्यात ग्रामस्थाचा मृत्यू झाला. पोलिस दलास संबंधित वाहन चालकाला पकडण्यात अपयश आल्याचा आराेप करीत आज संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर कूच केली.

villagers rasta roko at janavali kankavli traffic jam on mumbai goa highway
Kolhapur: बेकायदेशीर गर्भपात केल्याचा संशय, काेल्हापुरात डॉक्टर अटकेत; दाेघांकडून गर्भलिंग निदानाचे साहित्य जप्त

ग्रामस्थांनी अचानक मुंबई गोवा महामार्ग राेखून धरला. यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा महामार्गावर लागल्या आहेत. यामध्ये पर्यटनासाठी आलेल्या वाहनधारकांना भरदुपारच्या उन्हात वाहनातच बसून राहावं लागल्याने ते त्रस्त झाल्याचे पाहावयास मिळाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जाणवली येथील ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता पाेलिसांनी संयमाची भूमिका घेतली. ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

Edited By : Siddharth Latkar

villagers rasta roko at janavali kankavli traffic jam on mumbai goa highway
Krishi Seva Kendra: तीन कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द, नगरमध्ये खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com