VIDEO: शिंदे गटाच्या लोकांकडे EVM अनलॉकचं अॅप, आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप

Aaditya Thackeray On EVM: निकालासंदर्भातली गडबड समोर यायला नको म्हणून निवडणूक आयोगानं सीसीटीव्ही फुटेज नकार दिल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. या विरोधात कोर्टात जाणार असल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.
शिंदे गटाच्या लोकांकडे EVM अनलॉकचं अॅप, आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप
Aaditya Thackeray On EVMSaam Tv
Published On

शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकरांच्या मेव्हण्यावरून सुरू झालेला वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे. या वादावर आता ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगा अक्षय केलं आहे. निकालासंदर्भातली गडबड समोर यायला नको म्हणून निवडणूक आयोगानं सीसीटीव्ही फुटेज नकार दिल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय.

शिंदे गटाचे लोक ईव्हीएम उघडण्याचं अॅप असलेला मोबाईल घेऊन मतदान केंद्रावर गेल्याचा आरोपही आदित्य ठाकरेंनी केलाय. या विरोधात कोर्टात जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

शिंदे गटाच्या लोकांकडे EVM अनलॉकचं अॅप, आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप
Praful Patel News: विधानसभेला राष्ट्रवादीच्या वाट्याला किती जागा येणार? प्रफुल पटेलांनी मोठा आकडा सांगितला; म्हणाले...

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे म्हणाले की, ''निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला आहे. म्हणजे त्यांना ती अनिल मसीह सारखी फूटज नकोय वाटतं, कारण तिथे जी गडबड झाली, ती लोकांसमोर आली.''

ते म्हणाले, ''दुसरी गोष्ट म्हणजे जे शिंदे गटाचे लोक तिथे फोन घेऊन उभे होते, आज ते वृत्तपत्रातही आलं आहे की, त्यांच्या फोनमध्ये ईव्हीएम उघडण्याचं अॅप होतं. या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतरही त्यांना (रवींद्र वायकर यांना) शपथ दिली, तर मला वाटतं देशात लोकशाहीचा खून झाला आहे.''

शिंदे गटाच्या लोकांकडे EVM अनलॉकचं अॅप, आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप
Praful Patel News: विधानसभेला राष्ट्रवादीच्या वाट्याला किती जागा येणार? प्रफुल पटेलांनी मोठा आकडा सांगितला; म्हणाले...

दरम्यान, शिवसेना खासदार रवींद्र वायकरांनी ईव्हीएम छेडछाडीचे आरोप फेटाळून लावले आहेत. ईव्हीएमशी छेडछाड करण्याचा प्रश्नच येत नाही. तिथे हजारो पोलीस उपस्थित होते, एकटा वायकर काय करेल? असा सवाल करत हा विरोधकांचा रडीचा डाव असल्याचं वायकरांनी म्हंटलंय. निवडणूक आयोग सत्य समोर आणेल, असं वायकरांनी म्हटलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com