Aadhar Card Update: मोफत आधार कार्ड अपडेट करायला फक्त २ दिवस बाकी; जाणून घ्या प्रोसेस

Free Addhar Card Update Last Date: आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. अनेकदा आपल्याला आधार कार्डवरील पत्ता, फोटो बदलायचा असतो. यासाठी तुम्हाला आधार कार्ड अपडेट करावे लागेल.
Free Addhar Card Update Last Date
Free Addhar Card Update Last DateSaam Tv
Published On

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे ओळखपत्र आहे. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्ड आवश्यक असते. अनेकजा आपल्याला आधार कार्डवरील फोटो बदलायचा असतो. अनेकदा आधार कार्डवरील काही माहिती चुकीची असते, त्यामुळे त्या चुका सुधारणे खूप गरजेचे असते. यासाठी तुम्हाला आधार कार्ड अपडेट करावे लागते. सध्या आधार कार्ड मोफत अपडेट केले जात आहे. मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख १४ जून २०२४ आहे.

UIDAI ने आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवली आहे. आता १४ जून २०२४ पर्यंत तुम्ही मोफत आधार कार्ड अपडेट करु शकता. मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सेवा फक्त ऑनलाइन अपडेट करणाऱ्यांसाठी आहे. जर तुम्ही आधार केंद्राला भेट देऊन आधार अपडेट करत असाल, तर तुम्हाला त्यासाठी शुल्क भरावे लागेल.

आधार कार्ड ऑनलाइन कसे अपडेट करावे

मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला myAadhar पोर्टलवर जावे लागेल. तिथे तुम्हाला जी माहिती बदलायची असेल ती बदलून घ्यावी. तुम्ही तुमचा पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर ही माहिती अपडेट करु शकता. परंतु काही माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर जावे लागेल. तुम्हाला आयरिस किंवा बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर जावे लागेल.

Free Addhar Card Update Last Date
Tata Harrier EV या दिवशी होणार लॉन्च, एका चार्जमध्ये धावणार 500 KM; मिळणार हे जबरदस्त फीचर्स

ऑनलाइन आधार कार्ड अपडेट करण्याची प्रोसेस

यासाठी तुम्हाला UIDAIच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

यानंतर तुम्हाला आधार अपडेटचा पर्याय निवडावा लागेल. जर तुम्हाला पत्ता अपडेट करायचा असेल तर तुम्हाला तो पर्याय निवडावा लागेल.

यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका. त्यावर तुम्हाला ओटीपी येईल.

यानंतर कागदपत्रे अपडेटचा पर्याय निवडाला लागेल. तुम्हाला तुमच्या आधारची माहिती मिळेल. यानंतर सर्व माहिती सेव्ह करा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

यानंतर तुमचे आधार कार्ड अपडेट होईल. काही दिवसांनी तुम्हाला तुमचे अपडेट आधार कार्ड ऑनलाइन पाहायला मिळेल.

Free Addhar Card Update Last Date
Bajaj Housing Finance IPO : बजाज हाऊसिंग फायनान्सचा ७००० कोटींचा महा आयपीओ, शेअरचे दर्शनी मूल्य दहा रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com