Nagpur News : महिलेचा मोबाईल नंबर घेण्यासाठी लावली ५० हजाराची पैज; तिघे मित्र पोलिसांच्या ताब्यात

Nagpur News : तीन मैत्रीणी एका हॉटेलमध्ये जेवायला गेल्या होत्या. दरम्यान त्याच ठिकाणी तिघे मित्र हे सुद्धा जेवायला आले होते
Sadar Police Station Nagpur
Sadar Police Station NagpurSaam tv

पराग ढोबळे

नागपूर : अनोळखी महिलेचा फोन नंबर आणण्याची तीन जणांनी ५० हजार रुपयांची पैज लावली होती. मात्र ही पैज लावणे तिघांना (Nagpur) चांगलेच महागात पडले आहे. यात पन्नास हजार रुपयांची पैज लावणाऱ्या तिघांना महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी पोलिसांनी (Police) अटक केली आहे. 

Sadar Police Station Nagpur
Bribe Trap : पानटपरी चालकाकडून लाच; पोलीस कॉन्स्टेबल ताब्यात

सदरचा प्रकार नागपूरमध्ये घडला असून पोलिसांनी मनोज छाबरा, राजेश तालरेजा आणि सुधीर कुऱ्हाडकर या तिघांना ताब्यात घेतले आहे. (Crime News) या प्रकरणात तीन मैत्रीणी एका हॉटेलमध्ये जेवायला गेल्या होत्या. दरम्यान त्याच ठिकाणी तिघे मित्र हे सुद्धा जेवायला आले होते. जेवण सुरू असताना त्यांनी महिलाबद्दल टिपणी केली. मात्र महिलांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पण ते तिघे एवढ्यावर न थांबता त्यांनी हद्द पार करत महिलेशी जाऊन बोलणे आणि मोबाईल नंबर आणल्यास ५० हजार रुपये देऊ असे ठरवत पैज लावली.

Sadar Police Station Nagpur
Unseasonal Rain : चंद्रपुरात विजांच्या कडकडाटासह पाऊस

घरापर्यंत केला पाठलाग 

यात ठरल्यानुसार त्यांनी महिला राहत असलेल्या अपार्टमेंट पर्यंत पाठलाग केला. त्यानंतर बोलण्याचा प्रयत्न करत महिलेच्या मनाविरुद्ध कृत्य केल्याने विनयभंग केल्याची तक्रार सादर पोलिसांत केली. यात (Nagpur Police) पोलिसांनी संपूर्ण घटनेचा तपास केला असता यात तिघांचे नाव समोर आले. त्यानंतर एक जाणं हा नागपुरातील असून त्यांच्याकडून माहिती घेत दोघांना अमरावती (Amravati) तेथून ताब्यात घेतले आहे. तसेच अश्या घटना घडल्यास दुर्लक्ष न करता पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन उपायुक्त राहुल मदने यांनी केले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com