Bribe Trap : पानटपरी चालकाकडून लाच; पोलीस कॉन्स्टेबल ताब्यात

Dhule News : तक्रारदार असलेल्या पानटपरी चालकाकडून ३० हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र एवढी मोठी रक्कम देता येणे शक्य नव्हती.
Bribe Trap
Bribe TrapSaam tv

धुळे : धुळ्याच्या डी बी पथकातील पोलीस कॉन्स्टेबलला पान टपरी धारकाकडून लाच घेणे चांगलेच महागात पडल आहे, पंटरद्वारे संबंधित पोलीस कॉन्स्टेबलने लाच (Bribe) स्वीकारत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (ACB) रंगे हात अटक केली आहे. यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. 

Bribe Trap
Sambhajinagar News : संभाजीनगरात ड्रग्स, गुटख्यासह ७७ लाखांची दारू जप्त; आचारसंहितेची सुरुवात झाल्यापासूनची कारवाई

धुळ्याच्या (Dhule) आझादनगर पोलीस स्टेशन येथील डी.बी. पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अझरुददीन शेख यांनी तक्रारदार असलेल्या पानटपरी चालकाकडून ३० हजार रुपयांची मागणी केली होती. (Dhule Police) मात्र एवढी मोठी रक्कम देता येणे शक्य नव्हती. तरी देखील यापुर्वी १७ हजार रुपये स्विकारुन होते. यानंतर तडजोडी अंती उर्वरित १२ हजाराची रक्कम घ्यायचे बाकी होते. या दरम्यान तक्रारदाराने धुळे एसीबीकडे (Dhule ACB) तक्रार दिली. याची पडताळणी करून एसीबीने सापळा रचला.  

Bribe Trap
Dombivali News : चोरी करून उत्तर प्रदेशात बांधला आलिशान बंगला; दोन सराईत चोरट्याना अटक

दोघांविरोधात गुन्हा दाखल 

पोलीस कॉन्स्टेबल अझरुद्दीन शेख यांनी उर्वरित १२ हजार रुपयांची रक्कम पंटर अब्दुल बासित अन्सारी याला स्वीकारण्यास सांगितले. अब्दूलने रक्कम स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून, या दोघां विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com