Sambhajinagar News : संभाजीनगरात ड्रग्स, गुटख्यासह ७७ लाखांची दारू जप्त; आचारसंहितेची सुरुवात झाल्यापासूनची कारवाई

Sambhajinagar News : लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी १६ मार्चला आचारसंहिता लागू झाल्याने सार्त्र तपासणी मोहीम सुरु करण्यात आली
Sambhajinagar News
Sambhajinagar NewsSaam tv

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात येत आहे 16 मार्चपासून लागू झालेल्या (Sambhajinagar) आचारसंहिता लागल्यापासून सर्वत्र पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. त्यानुसार मागील दीड महिन्यात संभाजीनगर जिल्ह्यात पोलिसांकडून ड्रग्स, गुटखा यासह दारू असा सुमारे ७७ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.    

Sambhajinagar News
RTE Fees : 'आरटीई'च्या थकीत रक्कमेबाबत खंडपीठाकडून राज्य सरकारला विचारणा

लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) आता अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी १६ मार्चला आचारसंहिता लागू झाल्याने सार्त्र तपासणी मोहीम सुरु करण्यात आली. तसेच आचारसंहितेच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. मतदारांना आमिष किंवा धमकी देणे यासारखे प्रकार घडत असतात. त्यासाठी शस्त्र आमली पदार्थ यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी विविध भागात वाहनांची तपासणी केली जाते. 

Sambhajinagar News
Raver News : केळीला भाव नसल्याने कर्ज फेडीची विवंचना; तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन

दरम्यान या दोन महिन्याच्या कारवाईमध्ये संभाजीनगर शहर आणि ग्रामीण भागातून २७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तर शहरातील सर्वाधिक ४० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २४ लाखांची दारू, ५३ लाखांचा गुटखा तर १६ हजार रुपयाचे ड्रग्स असा सुमारे ७७ लाख ६४ हजार ४५७ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com