Raver News : केळीला भाव नसल्याने कर्ज फेडीची विवंचना; तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन

Jalgaon News : केळीला चांगला भाव न मिळाल्याने हर्षल नेहते हे कर्ज कसे फेडावे व व्यवहार कसे करावे, या विवंचनेत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
Raver News
Raver NewsSaam tv
Published On

रावेर (जळगाव) : निंभोरा बुद्रूक येथील एका तरुण शेतकऱ्याने केळीला चांगला भाव मिळत नसल्याने जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे (Raver) रावेरमध्ये केळीच्या भावसंबधी जिल्हाधिकारी यांनी मिटिंग घेतली होती. याच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. 

Raver News
Sambhajinagar Corporation : प्रारूप विकास आराखड्यावर ८ हजार ५०० आक्षेप; सुनावणीसाठी चार अधिकाऱ्यांची समिती

रावेर तालुक्यातील निंभोरा येथील हर्षल रवींद्र नेहते (वय ३८) असे मृत शेतकऱ्याचे (Farmer) नाव आहे. हर्षल नेहते यांनी शेतात केळीची लागवड केली होती. चांगले उत्पादन मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु केळी (Jalgaon) कापणी करून ती विक्रीच्या वेळी केळीला अपेक्षित भाव नव्हता. यामुळे लाखो रुपयांनी मिळणारे उत्पन्न घटले. यामुळे केळी (Banana Crop) उत्पादनासाठी लागलेला खर्चही देखील निघाला नाही. शिवाय केळीसाठी कर्ज देखील घेतले होते. 

Raver News
RTE Fees : 'आरटीई'च्या थकीत रक्कमेबाबत खंडपीठाकडून राज्य सरकारला विचारणा

केळीला चांगला भाव न मिळाल्याने हर्षल नेहते हे कर्ज कसे फेडावे व व्यवहार कसे करावे, या विवंचनेत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या नैराश्येतून त्यांनी शेतात ६ मे रोजी पेरूच्या झाडाला दोराच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत निंभोरा पोलिस ठाण्यात हरीश युवराज नेहते यांनी फिर्याद दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे व पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जात पंचनामा केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com