ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
UIDAI द्वारे मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची पहिली तारीख १५ डिसेंबर २०२३ होती. जी आता १४ जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
तुम्ही जर या तारखेपर्यंत आधार कार्ड अपडेट केले नाही तर तुम्हाला UIDAI च्या नियमांनुसार शुल्क भरावे लागेल.
सर्वप्रथम तुम्हाला https://myaadhaar.uidai.gov.in/ या लिंकला भेट द्यावी लागेल.
त्यानंतर तुमच्या आधार क्रमांकाने लॉगिन करावे.
यानंतर 'proceed to update address' हा पर्याय निवडावा.
त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर वन-टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल.
यानंतर तुम्ही Document Update या पर्यायावर क्लिक करावे.
यानंतर तुम्हाला तपशील दिसू लागेल त्याची पडताळणी करून लागू असलेल्या हायपरलिंकवर क्लिक करावे.
त्यानंतर ड्रॉप डाउन मेनूमधून identity proof आणि address proof निवडून कागदपत्रे अपलोड करावी आणि सबमिट बटणावर क्लिक करावे.
अपडेटची विनंती स्वीकारल्यानंतर, १४ अंकी URN क्रमांक तयार होईल.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.