Tata Harrier EV या दिवशी होणार लॉन्च, एका चार्जमध्ये धावणार 500 KM; मिळणार हे जबरदस्त फीचर्स

Tata Harrier EV Launch Confirmed: टाटा मोटर्स लवकरच आपल्या हॅरियर कारचा इलेक्ट्रिक व्हेरिएंट लॉन्च करणार आहे. याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...
Tata Harrier EV या दिवशी होणार लॉन्च, एका चार्जमध्ये धावणार 500 KM; मिळणार हे जबरदस्त फीचर्स
Tata Harrier EVSaam Tv

टाटा मोटर्सच्या हॅरियर कारला बाजारात मोठी मागणी आहे. ही कार स्टायलिश लूकसह आकारानेही मोठी आहे. आता कंपनी याच्या इलेक्ट्रिक व्हर्जनवर काम करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कारचे EV व्हर्जन मार्च 2025 पर्यंत लॉन्च केले जाऊ शकते. ही कंपनीची हाय पॉवर कार असेल. ज्यामध्ये 60 kWh चा बॅटरी पॅक असेल, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 500 किमीपर्यंत धावेल, असं बोललं जात आहे.

टाटा लवकरच आणखी एक EV कार Curvv EV लॉन्च करणार आहे. सध्या कंपनीने या कारच्या किंमतींचा खुलासा केलेला नाही. असा अंदाज वर्तवला जात आहे की, टाटा हॅरियर ईव्ही 30 लाख रुपयांच्या एक्स-शोरूमच्या प्रारंभिक किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते.

Tata Harrier EV या दिवशी होणार लॉन्च, एका चार्जमध्ये धावणार 500 KM; मिळणार हे जबरदस्त फीचर्स
अ‍ॅडव्हान्स फीचर्स आणि आकर्षक लूकसह Yamaha Fascino S लाँच; किंमत १ लाखांपेक्षा कमी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, EV कारच्या बाहेरील भागात काही बदल केले जातील. कारचा फ्रंट लूक बदलला जाऊ शकतो. तसेच याच्या फ्रंट ग्रिलला अतिशय स्टायलिश बनवले जाऊ शकते. याशिवाय कारला समोरून बॉक्सी लूक दिला जाऊ शकतो. याचे चार्जिंग सॉकेट कारच्या समोर असेल. दरम्यान, Tata Harrier ला भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाली आहे. ही स्मार्ट कार सध्या डिझेल व्हेरियंटमध्ये येते.

टाटा हॅरियर डिझेलची किंमत

ही टाटा कार 19.60 लाख रुपयांच्या प्रारंभिक किमतीत (ऑन रोड) उपलब्ध आहे. कारच्या टॉप मॉडेलची किंमत 33.49 लाख रुपये आहे. यात 2.0-लिटर, चार-सिलेंडर डिझेल इंजिन आहे.

Tata Harrier EV या दिवशी होणार लॉन्च, एका चार्जमध्ये धावणार 500 KM; मिळणार हे जबरदस्त फीचर्स
या नवीन दुचाकी लवकरच भारतात होणार लॉन्च, Suzuki ते TVS घेऊन येत आहेत नवीन मॉडेल

टाटाची हॅरियर स्मार्ट, प्युअर, ॲडव्हेंचर, फियरलेस आणि डार्क एडिशन अशा एकूण पाच प्रकारांमध्ये याचे डिझेल व्हेरिएंट येते. ही कार 168 BHP ची पॉवर जनरते करते. दरम्यान, आगामी इलेक्ट्रिक Harrier च्या किंमत आणि फीचर्सबद्दल अद्याप अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com