अ‍ॅडव्हान्स फीचर्स आणि आकर्षक लूकसह Yamaha Fascino S लाँच; किंमत १ लाखांपेक्षा कमी

Yamaha Fascino S Price: Yamaha Motor India कंपनीने बाजारात आपली नवीन स्कूटर लाँच केली आहे. ही स्कूटर अॅडव्हान्स फीचर्ससह लाँच करण्यात आली आहे. स्कूटरची किंमत १ लाखांपेक्षा कमी आहे.
Yamaha Fascino S
Yamaha Fascino S Saam Tv

Yamaha Motor India कंपनीने नुकतीच Yamaha Fascino S स्कूटर लाँच केली आहे. कंपनीने या स्कूटरचा 's' व्हेरियंट लाँच केला आहे. कंपनीच्या याआधीच्या मॉडेलपेक्षा ही स्कूटर अॅडव्हान्स फिचर्सने समृद्ध आहे. कंपनीने नवीन Yamaha Fascino S स्कूटर तीन वेगवेगळ्या रंगामध्ये लाँच केली आहे. या तिन्ही स्कूटरची किंमत वेगवेगळी आहे.

Yamaha Fascino S स्कूटरची सुरुवातीची किंमत ९३,७३० रुपये आहे. ही किंमत इतर व्हेरियंटप्रमाणे बदलू शकते.

Yamaha Fascino S स्कूटरमध्ये कंपनीने 125cc एअर कूल्ड इंजिन वापरले आहे. हे इंजिन 8.04bhp पॉवर आणि 10.3 Nm टॉर्क जनरेट करते. या स्कूटरमध्ये ५.२ लीटरची इंधनाची टाकू देण्यात आली आहे. स्कूटरच्या पुढच्या बाजूला १२ इंचाचे अलॉय व्हील तर मागील बाजूल १० इंचाचे अलॉल व्हील देण्यात आले आहे.

स्कूटरच्या समोरील बाजूस टेलीस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूला मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आले आहे. कंपनीने या स्कूटरच्या पुढील चाकामध्ये डिस्क ब्रेक दिला आहे. तर मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक दिला आहे. कंपनीची ही स्कूटर अँडव्हान्स फीचर्ससह लाँच झाली आहे.

Yamaha Fascino S
Gold Silver Price Fall : दागिने खरेदिकरणाऱ्यांसाठी खुशखबर; सोन्याच्या दरात घसरण, पण चांदी महागली

या स्कूटरमध्ये एका विशेष Answer Back नावाचे फंक्शन देण्यात आले आहे. या फंक्शच्या मदतीने तुम्ही तुमची स्कूटर कुठूनही शोधून काढू शकतात. यासाठी तुम्हाला Yamaha Scooter Answer Back हे अॅप डाउनलोड करावे लागेल.

Yamaha Fascino S
Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या की कमी झाल्या? वाचा तुमच्या शहरातील नवे दर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com