399cc इंजिन आणि फ्यूचरिस्टिक लूक; नवीन Kawasaki Ninja ZX-4RR भारतात लॉन्च, किंमत किती?

Kawasaki Ninja: दमदार इंजिनसह नवीन Kawasaki Ninja ZX-4RR भारतात लॉन्च झाली आहे. या नवीन बाईकचा लूक फ्यूचरिस्टिक आहे. जे तरुणांना आकर्षित करत आहे.
399cc इंजिन आणि फ्यूचरिस्टिक लूक; नवीन Kawasaki Ninja ZX-4RR भारतात लॉन्च, किंमत किती?
Kawasaki Ninja ZX-4RRSaam Tv

भारतात नवीन Kawasaki Ninja ZX-4RR लॉन्च झाली आहे. हॉलिवूड शैलीप्रमाणे दिसणारी ही बाईक निऑन आणि ब्लू ड्युअल कलरमध्ये सादर करण्यात आली आहे. याची एक्स-शोरूम किंमत 9.10 लाख रुपये आहे. ही बाईकची प्रारंभिक किंमत आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

ही एक हाय स्पीड बाईक आहे. नवीन Kawasaki Ninja बाईक 77 hp पॉवरवर 14500 rpm आणि 39 Nm टॉर्कवर 13000 rpm जनरेट करते. ही रेसर बाईक 250 किमी प्रतितास इतका टॉप स्पीड देते.

399cc इंजिन आणि फ्यूचरिस्टिक लूक; नवीन Kawasaki Ninja ZX-4RR भारतात लॉन्च, किंमत किती?
Hero Splendor Plus ची स्पेशल एडिशन लॉन्च, देते 73kmpl चा मायलेज; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

या स्पोर्ट्स बाईकमध्ये हेवी सस्पेन्शन, पुढच्या बाजूला फोर्क प्रीलोड आणि मागील बाजूस मोनोशॉक ॲडजस्टेबल सस्पेन्शन पॉवर आहे.

Kawasaki Ninja मध्ये पुढील आणि मागील दोन्ही टायरवर डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. ही बाईक स्प्लिट सीटसह येते, जी लांब मार्गांवर आरामदायी राइडसाठी चांगली आहे. ही बाईक फक्त 4.27 सेकंदात 0 ते 60kmph चा वेग प्राप्त करते. ही बाईक कंपनीच्या जुन्या बाईकची अपडेटेड व्हर्जन आहे. बाजारात याची स्पर्धा Honda च्या CBR650R शी आहे.

399cc इंजिन आणि फ्यूचरिस्टिक लूक; नवीन Kawasaki Ninja ZX-4RR भारतात लॉन्च, किंमत किती?
Royal Enfield लव्हर्ससाठी आनंदाची बातमी! लवकरच लॉन्च होणार ही दमदार बाईक; मिळणार अॅडव्हान्स फीचर्स

Kawasaki Ninja ZX-4RR फीचर्स

या बाईकचे 4 सिलेंडर इंजिन हाय पिकअप देते. तसेच याचे लिक्विड कूल्ड इंजिन लांब पल्ल्याच्या प्रवासात लवकर गरम होत नाही. यात 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 4.3 डिजिटल TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. ग्राहकांना यात चार ड्रायव्हिंग मोड स्पोर्ट्स, रोड, रेन आणि थ्री लेव्हल ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com