TVS ची नवीन मोपेड बाईक आहे जबरदस्त! देते 53 KM मायलेज, किंमत 44, 999 रुपयांपासून सुरू

TVS XL 100 Heavy Duty Moped Bike: TVS XL 100 मोपेड 53.5 kmpl पर्यंत मायलेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. यात 99.7 cc चे इंजिन देण्यात आले आहे.
TVS ची नवीन मोपेड बाईक आहे जबरदस्त! देते 53 KM मायलेज, किंमत 44, 999 रुपयांपासून सुरू
TVS XL 100 Heavy Duty Moped BikeSaam Tv

आजच्या घडीला दुचाकी वाहने ही प्रत्येक घराची गरज बनली आहे. यातच अनेक लोक चालवायला सोपी आणि खिशाला परवडेल, अशी बाईक खरेदी करणं पसंत करतात. यातच ग्रामीण आणि शहरी भागात मोपेडच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मोपेडबद्दल सांगणार आहोत जी बेस्ट लूकसह जबरदस्त मायलेज देते. ही मोपेड आहे TVS XL 100 Heavy Duty.

TVS XL 100 मोपेड 53.5 kmpl पर्यंत मायलेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. यात 99.7 cc चे इंजिन देण्यात आले आहे. ही ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. TVS च्या या मोपेडची प्रारंभिक किंमत 44,999 रुपये (एक्स-शोरू) आहे. याचे वजन 88 किलो आहे.

TVS ची नवीन मोपेड बाईक आहे जबरदस्त! देते 53 KM मायलेज, किंमत 44, 999 रुपयांपासून सुरू
Mahindra Thar 5 Door ची बुकिंग सुरू? डिझेल इंजिनसह मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या किंमत

TVS XL 100 मध्ये 4 लीटरची इंधन टाकी आहे. जी लांब पल्याचा प्रवासासाठी चांगली आहे. यात एक रुंद सीट मिळते. या मोपेडच्या सीटची उंची 787 मिमी आहे, कमी उंचीचे लोकही ही सहजपणे चालवू शकतात.

TVS XL 100 Heavy Duty चे टॉप मॉडेल 71794 रुपयांच्या ऑन रोड किमतीत येते. याचे स्मार्ट इंजिन 4.29 bhp पॉवर आणि 6.5 Nm टॉर्क जनरेट करते. TVS च्या या मोपेडला पुढील आणि मागील दोन्ही टायरवर ड्रम ब्रेक मिळतात. ज्यामुळे रायडरला मोपेडवर पूर्ण नियंत्रण मिळतं.

TVS ची नवीन मोपेड बाईक आहे जबरदस्त! देते 53 KM मायलेज, किंमत 44, 999 रुपयांपासून सुरू
Hero Hf Deluxe ची बाजारात मोठी मागणी, देते 65km चा मायलेज; किंमत फक्त 59,998 रुपये

ब्रेक्स व्यतिरिक्त TVS मध्ये एक Combined Braking System मिळते. यामध्ये दोन व्हेरियंट ऑफर केले जात आहेत. या मोपेडमध्ये 16 इंचाचे टायर मिळतात. यामध्ये स्पोक व्हील्स आहेत, जे याला स्टायलिश लूक देतात. यात पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मागील बाजूस ड्युअल हायड्रॉलिक स्प्रिंग सस्पेन्शन आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com