टाटा हे वाहन उत्पादनातील मोठे नाव आहे. टाटा कंपनी नेहमीच नवीन वाहने बाजारात लाँच करत असते. टाटा कंपनी वेगवेगळ्या प्रदेशांसाठी वेगवेगळी वाहने बाजारात लाँच करत असते. कंपनीने आतापर्यंत परवडणाऱ्या वाहनांपासून ते अगदी सर्वात महागडी वाहनेदेखील बनवली आहे. कंपनीने ग्रामीण बाजारपेठेतदेखील आपले वेगळे नाव कमावले आहे.
टाटा मोटर्स कंपनीने २०२४ मध्ये ग्रामीण क्षेत्रांतील विक्रीत प्रभावी कामगिरी केली, कंपनीच्या एकूण पॅसेंजर वेईकल्स विक्रीत ४० टक्क्यांचे योगदान दिले. टाटा मोटर्सच्या कार्स व एसयूव्हींच्या न्यू फॉरेव्हर श्रेणीची लोकप्रियता ग्रामीण ग्राहकांमध्ये देखील वाढली आहे, ज्यामध्ये ७० टक्के ग्राहक पहिल्यांदाच कार खरेदीदार आहेत. वाढत्या पायाभूत सुविधा, डिजिटल उपलब्धता आणि खरेदी क्षमतेसह ग्रामीण व शहरी ग्राहकांच्या अपेक्षांमधील तफावत कमी होत आहे.
टाटा मोटर्सची वाहने विकली जाण्याची कारणे
टाटा कार्स व एसयूव्ही ऑफरिंग्जची प्रबळ न्यू फॉरेव्हर श्रेणी विविध पॉवरट्रेन पर्यायांमध्ये (पेट्रोल, डिझेल, सीएनजी व ईव्ही) उपलब्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजांशी अनुकूल उत्तम पर्यायाची निवड करण्याचे पर्याय मिळतात. ग्रामीण बाजारपेठेत टाटा एसयूव्ही विक्री ३५ टक्क्यांवरून ७० टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
पर्यायी इंधन (सीएनजी + ईव्ही) विक्री आर्थिक वर्ष २२ मधील ५ टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २४ मध्ये २३ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. नाविन्यपूर्ण ट्विन-सिलिंडर सीएनजी तंत्रज्ञानामध्ये वाढ होत आहे, ग्रामीण बाजारपेठांमध्ये १६ टक्के सीएनजी उपलब्ध आहे.
ग्रामीण भागांमधील ग्राहकांची मागणी एमटीवरून एएमटी/एटीमध्ये बदलत आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या प्रमाणात १४ टक्के वाढ दिसण्यात आली आहे.
टाटा मोटर्सने राष्ट्रीय स्तरावर आपल्या नेटवर्कमध्ये वाढ केली आहे, जेथे विविध ठिकाणी ८५० हून अधिक ग्रामीण आऊटलेट्स (आर्थिक वर्ष २१ मध्ये ५१७), तसेच ग्रामीण भागांमधील ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी २६० वर्कशॉप्स आहेत.
नेटवर्क कृतींना १३५ अनुभव व्हॅन्सचे (आर्थिक वर्ष २१ मध्ये ३५ व्हॅन्स) पाठबळ आहे, ज्या मोबाइल शोरूम्स म्हणून सेवा देतात. या व्हॅन्समध्ये ऑडिओ व व्हिडिओ सुविधा आहे, ज्या विद्यमान व भावी ग्राहकांना माहिती प्रसारित यंत्रणा म्हणून कार्यक्षमपणे कार्य करतात, ज्यामुळे टाटा मोटर्सचे आऊटलेट नसलेल्या भागांमध्ये पोहोचण्यास मदत होते.
याव्यतिरिक्त, कंपनी ईजीसर्व्हच्या रूपात उपलब्ध असलेली घरपोच सेवा देते, जी तक्रारीचे त्वरित निराकरण करण्यास मदत करते.
कंपनी ग्राहकांना नाविन्यपूर्ण आर्थिक योजनांसह पाठिंबा देत आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत गावांमध्ये सखोल नेटवर्क्स असलेल्या बँकासोबत सहयोग केला आहे, तसेच कंपनीने अधिककरून स्थानिक व्यक्तींसाठी अनुकूल योजना सादर केल्या आहेत. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांसाठी कापणीच्या हंगामानुसार ६ मासिक ईएमआय योजना.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.