या नवीन दुचाकी लवकरच भारतात होणार लॉन्च, Suzuki ते TVS घेऊन येत आहेत नवीन मॉडेल

Upcoming Bikes And Scooter: सुझुकी आणि टीव्हीएस आपले नवीन मॉडेल भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.
या नवीन दुचाकी लवकरच भारतात होणार लॉन्च, Suzuki ते TVS घेऊन येत आहेत नवीन मॉ
Suzuki Access 125 FaceliftSaam Tv
Published On

येत्या 6 महिन्यांत दुचाकी बाजारात मोठी खळबळ उडणार आहे. अनेक नवीन बाईक आणि स्कूटरचे मॉडेल्स बाजारात येणार आहेत. टीव्हीएस, रॉयल एनफिल्ड आणि सुझुकी त्यांचे नवीन मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. हे नवीन मॉडेल जवळजवळ प्रत्येक सेगमेंटला लक्ष्य करतील. कोणते आहेत हे नवीन मॉडेल्स, याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...

TVS Raider 125 Flex-Fuel

TVS मोटर आपली 125cc इंजिन असलेली बाईक Raider फ्लेक्स इंधनासह लवकरच भारतात लॉन्च करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन मॉडेल या वर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च केले जाऊ शकतात. बाईकची अपेक्षित किंमत सुमारे 1.10 लाख रुपये असू शकते. बाईकमध्ये 125cc इंजिन दिले जाऊ शकते. जे 11.2hp पॉवर आणि 11.2Nm टॉर्क देईल.

या नवीन दुचाकी लवकरच भारतात होणार लॉन्च, Suzuki ते TVS घेऊन येत आहेत नवीन मॉ
Upcoming Scooters: आकर्षक लूक आणि उत्तम फीचर्ससह या वर्षी लाँच होणार ५ जबरदस्त स्कूटर; पाहा लिस्ट

Suzuki Access 125 Facelift

सुझुकी या महिन्यात आपली नवीन Access 125 स्कूटर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यावेळी ही स्कूटर पूर्णपणे नवीन बदलासह येऊ शकते. नवीन मॉडेल टेस्ट दरम्यान अनेक वेळा दिसली आहे. फेसलिफ्टेड सुझुकी अॅक्सेस सध्या बाजरात उपलब्ध असलेल्या 125cc इंजिनद्वारे समर्थित असेल, जे 8.7 PS पॉवर आणि 10 Nm टॉर्क जनरेट करेल.

हे इंजिन CVT गिअरबॉक्सने सुसज्ज असेल. फेसलिफ्ट Suzuki Access 125 मध्ये एक नवीन डिझाइन दिसेल. त्यात काही चांगल्या फिचर्सचा समावेश करण्यात येणार आहे. याला नवीन बॉडी पॅनलसह नवीन लूक मिळेल. यामध्ये नवीन हेडलाईटसोबतच नवीन टेललाइट पाहायला मिळणार आहे. यात 10 इंच व्हील्स, ग्रॅब रेल, फ्रंट स्टोरेज, लांब आणि रुंद सीट ग्राहकांना मिळू शकते.

या नवीन दुचाकी लवकरच भारतात होणार लॉन्च, Suzuki ते TVS घेऊन येत आहेत नवीन मॉ
31 चा मायलेज, स्पोर्टी लूक, 5 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या 2 कार्स

हे इंजिन CVT गिअरबॉक्सने सुसज्ज असेल. फेसलिफ्ट Suzuki Access 125 मध्ये एक नवीन डिझाइन दिसेल. त्यात काही चांगल्या फिचर्सचा समावेश करण्यात येणार आहे. याला नवीन बॉडी पॅनलसह नवीन लूक मिळेल. यामध्ये नवीन हेडलाईटसोबतच नवीन टेललाइट पाहायला मिळणार आहे. यात 10 इंच व्हील्स, ग्रॅब रेल, फ्रंट स्टोरेज, लांब आणि रुंद सीट ग्राहकांना मिळू शकते. कंपनी लवकरच Classic 350 Bobber, Scram 650 Guerrilla 450 आणि Classic 650 Twin बाईक लॉन्च करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com