Bajaj Housing Finance IPO : बजाज हाऊसिंग फायनान्सचा ७००० कोटींचा महा आयपीओ, शेअरचे दर्शनी मूल्य दहा रुपये

Bajaj Housing Finance : बजाज उद्योग समूहाची उप कंपनी बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ने सात हजार कोटी रुपयांचा महाकाय आयपीओ लवकरच बाजारात आणण्याचे ठरवले आहे. त्यासंदर्भातील डी. आर. एच. पी. त्यांनी सेबीकडे सादर केले आहे.
Bajaj Housing Finance IPO
Bajaj Housing Finance IPOSaam Digital

बजाज उद्योग समूहाची उप कंपनी बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ने सात हजार कोटी रुपयांचा महाकाय आयपीओ लवकरच बाजारात आणण्याचे ठरवले आहे. त्यासंदर्भातील डी. आर. एच. पी. त्यांनी सेबीकडे सादर केले आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स ही, ठेवी न घेणारी देशातील प्रमुख गृहवित्त कंपनी आहे. तिची नोंदणी नॅशनल हाऊसिंग बँकेकडे २०१५ मध्ये झाली असून घरतारण कर्ज देण्याचा व्यवसाय त्यांनी २०१८ पासून सुरू केला आहे.

बजाज हाऊसिंग फायनान्स चा आयपीओ इशू सात हजार कोटी रुपयांचा असेल, हे त्यांच्या डी आर एच पी मधून स्पष्ट झाले आहे. यातील चार हजारकोटी रुपयांचे इक्विटी शेअर नव्याने विक्रीस आणले जातील. तर बजाज फायनान्स लिमिटेड तर्फे तीन हजारकोटी रुपयांचे शेअर विक्रीला ठेवले जातील. आयपीओ मधील या शेअरचे दर्शनी मूल्य दहा रुपये राहील.

या आयपीओ मध्ये कर्मचाऱ्यांसाठी तसेच प्रवर्तकांसाठीही काही वाटा राखीव असेल. भविष्यात कर्ज देण्यासाठी कंपनीचा भांडवली पाया सक्षम व्हावा यासाठी आयपीओमधून मिळणारी ही रक्कम वापरली जाईल. या आयपीओ मधील पन्नास टक्के शेअर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील.

Bajaj Housing Finance IPO
Gold Silver Price Today : दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर; सोने घसरले, पण चांदी वधारली!

पंधरा टक्के शेअर बड्या वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी तर ३५ टक्के शेअर छोट्या गुंतवणूकदारांसाठी राखीव राहतील. बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांखेरीज अन्य सर्व गुंतवणूकदारांना ए. एस. बी. ए. पद्धतीमार्फतच शेअरसाठी अर्ज करावे लागतील. या शेअरची नोंदणी एन. एस. इ. व बी. एस. ई. वर होईल.

Bajaj Housing Finance IPO
Pradhan Mantri Awas Yojana: पीएम आवास योजनेअंतर्गत सरकार बांधणार ३ कोटी नवीन घरे; तुम्हीही घेऊ शकता योजनेचा लाभ;कसं? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com