Pradhan Mantri Awas Yojana: पीएम आवास योजनेअंतर्गत सरकार बांधणार ३ कोटी नवीन घरे; तुम्हीही घेऊ शकता योजनेचा लाभ;कसं? जाणून घ्या

PM Awas Yojana Eligibility: प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे घर असावे, असं स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप आधीपासून आर्थिक बचत केली जाते. त्यामुळेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नागरिकांना घरे दिली जात आहेत.
Pradhan Mantri Awas Yojana
Pradhan Mantri Awas YojanaGoogle

आपले स्वतः चे हक्काचे घर घेण्याचे सर्वांचे स्वप्न असते. घर घेण्यासाठी अनेकजण खूप आधीपासूनच बचत करतात. घर घेणे हे प्रत्येकालाच परवडत नाही. त्यामुळेच सरकारच्या अनेक योजना आहेत. या योजनांच्या मदतीने तु्म्ही घर घेऊ शकतात. अशीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना. (PM Awas Yojana)प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्ही सरकार तुम्हाला घर घेण्यासाठी मदत करते.

सोमवारी मंत्रीमंडळाची बैठक झाली. यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३ कोटी नवीन घरे देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने गेल्या १० वर्षात ४.२१ कोटी घरे बांधली आहे.

देशातील प्रत्येक नागरिकाचे स्वतः चे घर असावे, याच उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत सरकार २ कोटी घरे बांधणार होते.

या योजनेअंतर्गत देशातील दुर्बल घटक, गरीब लोक आणि ग्रामीण भागातील लोकांना कमी किमतीत घरे उपलब्ध करुन दिली जातात. याच उद्देषाने पंतप्रधान मोदी यांनी ही योजना सुरु केली होती. २०२३ च्या अर्थसंकल्पात सरकारने पंतप्रधान आवास योजनेच्या निधीत ६६ टक्क्यांनी वाढ केली आहे.

Pradhan Mantri Awas Yojana
अ‍ॅडव्हान्स फीचर्स आणि आकर्षक लूकसह Yamaha Fascino S लाँच; किंमत १ लाखांपेक्षा कमी

अल्प उत्पन्न असलेला गट, मध्यम उत्पन्न असलेला गट आणि EWS गटाला या योजनेचा लाभ मिळतो. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येतो. पीएम आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत. पीएम आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी तु्म्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज करु शकतात.

Pradhan Mantri Awas Yojana
Gold Silver Price Fall : दागिने खरेदिकरणाऱ्यांसाठी खुशखबर; सोन्याच्या दरात घसरण, पण चांदी महागली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com