Jio Plan: जगातील सर्वात मोठ्या टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी एअरटेलने सादर केली योजना

Jio Plan: आयसीसी टी-२० वर्ल्डकपसाठी एअरटेलने नवीन योजना सादर केली आहे.
Jio Plan: जगातील सर्वात मोठ्या टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी एअरटेलने सादर केली योजना
jio plansaam tv news

भारतातील अग्रगण्य दूरसंचार सेवा पुरवठादार भारती एअरटेलने ("एअरटेल") जगातील सर्वात मोठी टी-20 क्रिकेट स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून ग्राहकांसाठी खास पॅक चे अनावरण केले आहे. व्यतय न येता आणि अखंड पाहण्याचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी, एअरटेल आपल्या प्रीपेड, पोस्टपेड, आंतरराष्ट्रीय रोमिंग, होम ब्रॉडबँड आणि एअरटेल डिजिटल टीव्ही वापरकर्त्यांमध्ये भारतातील जगातील सर्वात मोठ्या टी 20 क्रिकेट स्पर्धेचा अधिकृत स्ट्रीमिंग भागीदार डिस्ने + हॉटस्टारचे तीन महिन्यांचे सब्सक्रिप्शन देत आहे.

टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी प्रीपेड प्लॅन 499 रुपयांपासून सुरू होतात आणि डिस्ने + हॉटस्टारचे तीन महिन्यांचे सब्सक्रिप्शनसह 28 दिवसांसाठी दररोज हाय स्पीड 3 जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये एअरटेल एक्सट्रीम प्लेवर 20+ ओटीटी मोफत अनलॉक केले जातात. 839 रुपयांचा 84 दिवसांचा प्लॅन देखील ऑफर मध्ये आहे ज्यात दररोज 2 जीबी डेटासह समान फायदे मिळतात. 3359 रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये डिस्ने+ हॉटस्टारचे एक वर्षाचे सब्सक्रिप्शन, एक्सट्रीम अॅपवर ओटीटी प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस आणि दररोज 2.5 जीबी डेटा मिळतो.

पोस्टपेड प्लॅनमध्ये एक वर्षाचे डिस्ने + हॉटस्टार सब्सक्रिप्शन आणि एक्सस्ट्रीम अॅपवर 20 पेक्षा जास्त ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रवेश, अमर्यादित 5 जी डेटा आणि कौटुंबिक अॅड-ऑन फायदे देखील मिळतात.

999 रुपये, 1498 रुपये आणि 3999 रुपयांच्या हाय स्पीड इंटरनेट, एंटरटेनमेंट, प्रोफेशनल आणि इन्फिनिटी प्लॅनच्या शोधात असलेल्या घरगुती ग्राहकांना विविध स्पीड पर्याय देण्यात आले आहेत. याशिवाय प्लानमध्ये अमर्यादित डिस्ने+ हॉटस्टार सब्सक्रिप्शन आणि इतर फायद्यांचाही समावेश आहे.

Jio Plan: जगातील सर्वात मोठ्या टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी एअरटेलने सादर केली योजना
IPL 2025 Mega Auction: मेगा ऑक्शनमध्ये किती खेळाडूंना रिटेन करता येणार? फ्रेंचाईजींचं टेन्शन वाढलं!

लाइव्ह मॅच पाहण्यासाठी अमेरिका आणि कॅनडाला जाणाऱ्या चाहत्यांसाठी कंपनीने इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटीसह इंटरनॅशनल रोमिंग पॅक सुलभ केले आहेत, जेणेकरून चाहत्यांना सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल आणि दररोज 133 रुपयांमध्ये आंतरराष्ट्रीय रोमिंगचा आनंद घेता येईल, ज्यामुळे देशांतर्गत सिमच्या तुलनेतही परदेशात लाइव्ह पाहणे परवडते.

एअरटेल डिजिटल टीव्हीवर, क्रिकेट प्रेमी आता भारताच्या पहिल्या 4के सेवेचा आनंद घेऊ शकतात जे जगातील सर्वात मोठ्या टी 20 क्रिकेट हंगामात आणखी आकंठ आणि चित्तथरारक अनुभव घेण्यास मदत करते.

Jio Plan: जगातील सर्वात मोठ्या टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी एअरटेलने सादर केली योजना
IPL 2024 Final: सारखा स्कोर सारखं चेज! IPLच्या दोन फायनल स्क्रिप्टेड की योगायोग?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com