प्रभास- दीपिकाच्या 'Kalki 2898 AD' ची जगभरात क्रेझ; तिसऱ्या दिवशी केली जबरदस्त कमाई

Kalki 2898 AD Worldwide Collection : प्रभास- दीपिकाचा 'कल्की २८९८ एडी' चित्रपट रिलीज झाला. रिलीज होताच प्रेक्षकांकडून चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने जगभरात ३०० कोटींचा टप्पा पार केला.
प्रभास- दीपिकाच्या 'Kalki  2898 AD' ची जगभरात क्रेझ; तिसऱ्या दिवशी केली जबरदस्त कमाई
Kalki 2898 AD Worldwide CollectionSaam Tv

२०२४ या वर्षात अनेक चित्रपट रिलीज झाले आहेत. पण त्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आपली म्हणावी तशी जादू दाखवली नाही. नुकताच बॉक्स ऑफिसवर प्रभास- दीपिकाचा 'कल्की २८९८ एडी' चित्रपट रिलीज झाला. 'कल्की २८९८ एडी' रिलीज होताच प्रेक्षकांकडून चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने जगभरामध्ये पहिल्या तीन दिवसांत ३०० कोटींचा टप्पा पार केलेला आहे. नुकतंच सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टकडून चित्रपटाच्या कमाईचा आकडा शेअर करण्यात आलेला आहे.

प्रभास- दीपिकाच्या 'Kalki  2898 AD' ची जगभरात क्रेझ; तिसऱ्या दिवशी केली जबरदस्त कमाई
Upendra Limaye News : उपेंद्र लिमयेने खरेदी केली अलिशान महागडी कार; सहकुटुंब केली नव्या कारची पूजा, पाहा VIDEO

२०२४ या वर्षात अनेक चित्रपट रिलीज झाले आहेत. पण त्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आपली म्हणावी तशी जादू दाखवली नाही. नुकताच बॉक्स ऑफिसवर प्रभास- दीपिकाचा 'कल्की २८९८ एडी' चित्रपट रिलीज झाला. 'कल्की २८९८ एडी' रिलीज होताच प्रेक्षकांकडून चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने जगभरामध्ये पहिल्या तीन दिवसांत ३०० कोटींचा टप्पा पार केलेला आहे. नुकतंच सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टकडून चित्रपटाच्या कमाईचा आकडा शेअर करण्यात आलेला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपट तब्बल ६०० कोटींमध्ये निर्मित‍ झालेला आहे. सायन्स आणि फिक्शनवर आधारित असलेल्या या चित्रपटामध्ये AI टेक्नोलॉजी, ग्राफिक्स, ॲनिमेशन सारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहे. चित्रपटाने तीन दिवसांत देशामध्ये २२० कोटींची कमाई केलेली आहे. तर जगभरात चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा पार केलेला आहे. नागअश्विन दिग्दर्शित चित्रपटाने जगभरात दोन दिवसांत २९८. ५० कोटींची कमाई केलेली आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ एवढी होती की पहिल्या विकेंडसाठी जबरदस्त प्री-बुकिंग झाली होती.

प्रभास- दीपिकाच्या 'Kalki  2898 AD' ची जगभरात क्रेझ; तिसऱ्या दिवशी केली जबरदस्त कमाई
Shalini Pandey : ‘महाराज’ चित्रपटातील ‘त्या’ सीननंतर डिस्टर्ब झाली होती शालिनी पांडे, सांगितला शुटिंग दरम्यानचा किस्सा

सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'कल्कि 2898 एडी'ने केजीएफ २, जवान, गदर २, बाहुबली २ या चित्रपटांचं रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. नाग अश्विन दिग्दर्शित चित्रपटाचे कथानक भगवान विष्णूच्या आधुनिक अवतारावर आधारीत आहे. 2D सोबतच हा चित्रपट IMAX आणि 3D फॉर्मेटमध्येही रिलीज झालेला आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, दुल्कर सलमान, कमल हसन, दिशा पटानी अशी तगडी स्टारकास्ट आहे. प्रेक्षक, सेलिब्रिटी आणि समीक्षकांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

प्रभास- दीपिकाच्या 'Kalki  2898 AD' ची जगभरात क्रेझ; तिसऱ्या दिवशी केली जबरदस्त कमाई
Shivani Kumar : "पाठीमागून नाही, थेट तोंडावर बोलायचं..."; शिवानी कुमार बिग बॉसच्या घरातल्या स्पर्धकांवर संतापली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com