Shalini Pandey : ‘महाराज’ चित्रपटातील ‘त्या’ सीननंतर डिस्टर्ब झाली होती शालिनी पांडे, सांगितला शुटिंग दरम्यानचा किस्सा

Shalini Pandey On Rap Scene : ‘महाराज’ चित्रपटामध्ये जुनैद खानसोबत मुख्य भूमिकेत जयदीप अहलावत, शर्वरी वाघसह शालिनी पांडे हिची महत्त्वाची भूमिका आहे. सध्या शालिनी पांडेच्या भूमिकेची जोरदार चर्चा होत आहे.
Shalini Pandey : ‘महाराज’ चित्रपटातील ‘त्या’ सीननंतर डिस्टर्ब झाली होती शालिनी पांडे, सांगितला शुटिंग दरम्यानचा किस्सा
Shalini Pandey On Rap SceneSaam Tv

नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘महाराज’ चित्रपटातून आमिर खानचा मुलगा जुनैद खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. जुनैद खानसोबत चित्रपटात मुख्य भूमिकेत जयदीप अहलावत, शर्वरी वाघसह अभिनेत्री शालिनी पांडे हिची महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटात तिने जयदीप अहलावतसोबत एक सेक्स सीन दिला आहे. सीन शूट करतानाचा अनुभव शालिनीने मुलाखतीत सांगितला आहे.

Shalini Pandey : ‘महाराज’ चित्रपटातील ‘त्या’ सीननंतर डिस्टर्ब झाली होती शालिनी पांडे, सांगितला शुटिंग दरम्यानचा किस्सा
Shivani Kumar : "पाठीमागून नाही, थेट तोंडावर बोलायचं..."; शिवानी कुमार बिग बॉसच्या घरातल्या स्पर्धकांवर संतापली

चित्रपटाची कथा वाचल्यावर पात्र साकारत असलेली किशोरी मूर्ख आहे, असं शालिनीला वाटलं होतं. शालिनी पांडे तो सीन शूट करताना खूप घाबरलेली होती, असंही तिने मुलाखतीमध्ये सांगितले. चित्रपटामध्ये, जयदीपने जदुनाथ महाराजाची भूमिका साकारली आहे. तर शालिनीने किशोरी नावाचे पात्र साकारले आहे.

चित्रपटाचे कथानक १८०० च्या काळातील आहे. ‘चरणसेवा’ प्रथेच्या नावाखाली मुलींचं शारीरिक शोषण केले जायचे. आपल्याकडून बलात्कार होणं हे एकप्रकारे पवित्र आहे, असं महाराजने समाजाला पटवून दिलं होतं.

घडणाऱ्या या प्रकाराकडे समाज डोळेझाक करायचा, कारण त्यांनाही ते योग्य वाटायचं. या सीनबद्दल अभिनेत्रीने मुलाखतीमध्ये भाष्य केले आहे.

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत शालिनीने सांगितले की, "जेव्हा मी ‘चरणसेवा’चा सीन प्रत्यक्षात महाराजांसोबत शूट केला, तेव्हा माझ्यावर काय परिणाम झाला हे मला काही कळलंच नाही. कारण तो सीन शूट केल्यानंतर अचानक मी बाहेर गेले आणि मी माझ्या टीमला सांगितलं की, मला बंद खोलीत राहायचं नाही. मला वेळ हवा आहे आणि ताजी हवा हवी आहे. तो सीन शूट केल्यामुळे मी अस्वस्थ झाले होते."

Shalini Pandey : ‘महाराज’ चित्रपटातील ‘त्या’ सीननंतर डिस्टर्ब झाली होती शालिनी पांडे, सांगितला शुटिंग दरम्यानचा किस्सा
Rangada Movie : मातीतली अस्सल कुस्ती अन् बैलगाडा शर्यतीचा थरार 'रांगडा'मध्ये दिसणार, पाहा जबरदस्त Trailer

"याबद्दल मी स्वत: दिग्दर्शकांनाही सांगितले. त्यासोबतच को- स्टार जयदीपलाही ही गोष्ट समजावून सांगितली. रिल लाईफ आणि रियल लाईफ यामध्ये खूप मोठं अंतर आहे. खऱ्या आयुष्यात माझी विचारक्षमता फार वेगळी आहे. पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचली तेव्हा मला चित्रपटातलं किशोरी हे पात्र अत्यंत मूर्ख वाटलं होतं. पण मला नंतर कळलं की, ती मूर्ख नाही. कारण तिला चांगलं-वाईट काय आहे, हे माहीतच नाही. कारण ती करणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायची."

Shalini Pandey : ‘महाराज’ चित्रपटातील ‘त्या’ सीननंतर डिस्टर्ब झाली होती शालिनी पांडे, सांगितला शुटिंग दरम्यानचा किस्सा
Vicky Kaushal And Katrina Kaif News : कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांवर विकी कौशल पहिल्यांदाच बोलला; म्हणाला, "योग्य वेळ आली की सांगेल..."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com