Shivani Kumar : "पाठीमागून नाही, थेट तोंडावर बोलायचं..."; शिवानी कुमार बिग बॉसच्या घरातल्या स्पर्धकांवर संतापली
Shivani Kumar AngryInstagram

Shivani Kumar : "पाठीमागून नाही, थेट तोंडावर बोलायचं..."; शिवानी कुमार बिग बॉसच्या घरातल्या स्पर्धकांवर संतापली

Bigg Boss OTT 3 Contestant : बिग बॉसच्या घरातील सर्वच स्पर्धकांकडून युट्यूबर शिवानी कुमारवर राग व्यक्त केला जात आहे. या आठवड्यात झालेल्या नॉमिनेशन लिस्टमध्येही तिचा समावेश आहे.
Published on

सध्या सोशल मीडियासह सर्वत्र 'बिग बॉस ओटीटी ३'ची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या ९ ते १० दिवसांपासून सुरू झालेला हा शो चांगलाच चर्चेत आला आहे. या आठवड्यात पहिलाच नॉमिनेशन राऊंड पार पडला. यामध्ये नीरज गोयत हा स्पर्धक घराबाहेर पडला.

सध्या बिग बॉसच्या घरातील सर्वच स्पर्धक युट्यूबर शिवानी कुमारवर नाराज आहेत. तिच्या कामावर सर्वच स्पर्धकांकडून राग व्यक्त केला जात आहे, या आठवड्यात झालेल्या नॉमिनेशन लिस्टमध्येही तिचा समावेश आहे. 'जिओ सिनेमा'च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच नवा प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे. प्रोमोमध्ये घरातील काही स्पर्धक बोलताना दिसत आहे.

Shivani Kumar : "पाठीमागून नाही, थेट तोंडावर बोलायचं..."; शिवानी कुमार बिग बॉसच्या घरातल्या स्पर्धकांवर संतापली
Rangada Movie : मातीतली अस्सल कुस्ती अन् बैलगाडा शर्यतीचा थरार 'रांगडा'मध्ये दिसणार, पाहा जबरदस्त Trailer

व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये, घरातील सर्व स्पर्धक बाहेरच्या स्पेसरूममध्ये एकत्र बसलेले दिसत आहेत. अरमान मलिक, सना सुलतानसोबत काही स्पर्धक बसलेले दिसत आहे. त्यांच्यामध्ये चर्चा होते की, "शिवानी घरातल्या लोकांमध्येच भांडण लावतेय. ती हे काम गेल्या अनेक दिवसांपासून करत आहे. ज्या गोष्टींवरून वाद चालला आहे, त्यावरच तिने रिॲक्ट करायला हवं. कोणत्याही गोष्टीमध्ये उगाचच हस्तक्षेप करू नये." सोबतच तिच्या कामावरूनही तिला घरातल्या नागरिकांनी चांगलेच सुनावले आहे. त्यांच्यामध्ये हे संभाषण सुरू असताना, तितक्यात शिवानी कुमार तिथे येते.

घरातल्यांमध्ये होत असलेलं बोलणं शिवानी बंद दारामागून ऐकत असते. त्यांच्या चर्चा रंगत असतानाच तिने तिथे एन्ट्री मारली. शिवानी म्हणते, "पाठीमागून नाही तर तोंडावर बोला. जे काही बोलायचं आहे, थेट तोंडावर बोला" अशी प्रतिक्रिया ती देते. आज अभिनेता अनिल कपूरचा 'शनिवार का वार' असणार आहे. यामध्ये अनिल कपूर कोणत्या कोणत्या स्पर्धकांची शाळा घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या आठवड्यात दुसरं नॉमिनेशनही पार पडणार आहे. या नॉमिनेशन राऊंडमध्ये कोणता स्पर्धक घराबाहेर जातो ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Shivani Kumar : "पाठीमागून नाही, थेट तोंडावर बोलायचं..."; शिवानी कुमार बिग बॉसच्या घरातल्या स्पर्धकांवर संतापली
Vicky Kaushal And Katrina Kaif News : कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांवर विकी कौशल पहिल्यांदाच बोलला; म्हणाला, "योग्य वेळ आली की सांगेल..."

या आठवड्यामध्ये झालेल्या टास्कमध्ये, बिग बॉसने ७ स्पर्धकांना नॉमिनेट केले आहे. त्यामध्ये वडा पाव गर्ल चंद्रिका गेरा दीक्षित, युट्यूबर अरमान मलिक आणि त्याची पहिली पत्नी पायल मलिक, सिंगर सना सुलतान, सोशल मीडिया एन्फ्लूएंसर लव कटारिया, टेलिव्हिजन अभिनेता साई केतन राव आणि कानपूरची शिवानी कुमारच्या नावाचा समावेश आहे. यामधून कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Shivani Kumar : "पाठीमागून नाही, थेट तोंडावर बोलायचं..."; शिवानी कुमार बिग बॉसच्या घरातल्या स्पर्धकांवर संतापली
"आता कल्ला तर होणारच, पण..." ‘Bigg Boss Marathi 5’चा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित; उत्सुकता शिगेला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com