"आता कल्ला तर होणारच, पण..." ‘Bigg Boss Marathi 5’चा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित; उत्सुकता शिगेला

Bigg Boss Marathi 5 New Promo : बहुप्रतिक्षित ‘बिग बॉस मराठी ५’चा दुसरा प्रोमो रिलीज झालेला आहे. लवकरच हा रिॲलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
"आता कल्ला तर होणारच, पण..." ‘Bigg Boss Marathi 5’चा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित; उत्सुक शिगेला
Bigg Boss Marathi 5 New PromoSaam Tv

'बिग बॉस मराठी ५' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शोची घोषणा करण्यात आलेली होती. आता अखेर निर्मात्यांकडून शोचा दुसरा प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे. यंदाच्या सीझनला अभिनेते महेश मांजरेकर होस्टिंग करणार नसून अभिनेता रितेश देशमुख होस्ट करताना दिसणार आहे. "आता कल्ला तर होणारच, पण माझ्या स्टाईलने" असं म्हणत रितेश देशमुखची धमाकेदार एन्ट्री प्रोमोमध्ये पाहायला मिळते आहे.

"आता कल्ला तर होणारच, पण..." ‘Bigg Boss Marathi 5’चा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित; उत्सुक शिगेला
Bad News Film : 'एका बाळाचे २ बाप', विकी कौशल, तृप्ती डिमरीच्या 'बॅड न्यूज'चा तुफान कॉमेडी ट्रेलर रिलीज; एकदा पाहाचं

नुकताच कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे. शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, रितेश देशमुखच्या पाठी मागे असणाऱ्या मोठ्या स्क्रीनवर गेल्या ४ सीजनमध्ये झालेला राडा मोठ्या स्क्रिनवर पाहाताना दिसतोय.

रितेश मोठ्या स्क्रिनवर भांडण पाहत असताना अभिनेता निखिल रत्नापारखी येऊन रितेशला म्हणतो, "सर, तर ही आहे सगळी बिग बॉसची दुनिया. पहिल्यांदा तुम्ही होस्ट करणार आहे बिग बॉस, तर हे बघून घ्या. हे असं सगळं असतं बिग बॉसच्या घरात," असं म्हणत निखिल रितेशला शोबद्दल सांगत असतो. त्यावर रितेश बोलतो, "यापुढे हे असंच असणार नाही... आता मी आलोय... कल्ला तर होणारच, तो ही माझ्या स्टाईलने..." असं म्हणत रितेश देशमुख त्याच्या स्टाईलमध्ये उत्तर देत यंदाचा शो होस्ट करणार असल्याचं सांगतो.

अद्यापही निर्मात्यांकडून शोच्या तारखेचा खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे चाहत्यांना शो केव्हापासून सुरू होणार, याची कमालीची उत्सुकता आहे. गेले ४ सीझन 'बिग बॉस मराठी' शोचं होस्टिंग अभिनेते महेश मांजरेकर होस्ट करत होते. पण यंदा पहिल्यांदाच ते शो होस्ट करणार नसून त्यांच्या जागी मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख दिसणार आहे. अनेक युजर्सने रितेश देशमुखचं स्वागत केलं आहे. या प्रोमोमध्ये रितेशचा रूबाब अन् त्याची 'लय भारी' स्टाईल पाहायला मिळत आहे. तसेच त्याचा कमाल स्वॅगही अनुभवायला मिळत आहे. रितेशची 'बॉसी'गिरी पाहण्याची चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. 'बिग बॉस'मध्ये आतापर्यंत एका वेगळ्या पद्धतीचे खेळ, नियम आणि टास्क होते. पण आता रितेशच्या येण्याने नावीन्य येणार असल्याचं प्रोमोवरुन स्पष्ट दिसत आहे.

"आता कल्ला तर होणारच, पण..." ‘Bigg Boss Marathi 5’चा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित; उत्सुक शिगेला
Ridhima Pathak News : मॉडेल रिद्धिमा पाठकसह तिच्या भावाविरोधात फसवणुकीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय ?

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या या दुसऱ्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. प्रोमो पाहून आधीच्या ४ सीझनपेक्षा यंदाचा सीझन सुपरहिट होणार असल्याची प्रतिक्रिया अनेक युजर्सने दिलेली आहे. विशाल निकम, किरण माने, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, शिल्पा नवलकर, शिव ठाकरे, गायत्री दातार यांच्यासह आधीच्या पर्वात सहभागी झालेल्या स्पर्धकांनी सुद्धा या नव्या प्रोमोचं कौतुक केलं आहे.

"आता कल्ला तर होणारच, पण..." ‘Bigg Boss Marathi 5’चा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित; उत्सुक शिगेला
Kalki 2898 AD चा बॉक्स ऑफिसवर धमाका; दोन दिवसातच पार केला १०० कोटींचा टप्पा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com