Mahesh Manjrekar On Trollers
सध्या मराठी प्रेक्षकांमध्ये ‘जुनं फर्निचर’ चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपट येत्या २६ एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. आई, वडील आणि मुलाच्या नात्याबद्दल भाष्य करणाऱ्या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी नुकतीच मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी ट्रोलर्सवर सडकून टीका केलेली आहे. त्यांच्या खासगी आयुष्यात ट्रोलिंग करणाऱ्यांबद्दल त्यांनी भाष्य केले आहे. (Mahesh Manjrekar)
एका मराठी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले की, "मला खासगी गोष्टींबद्दल बोलणाऱ्यांचा भयंकर राग येतो. अनेकदा मला त्या गोष्टींवर दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला जातो. पण मी त्या गोष्टींवर का दुर्लक्ष करू? मी तुमच्या केव्हा खासगी आयुष्याबद्दल बोललोय का ? खासगी गोष्टींमध्ये ढवळाढवळ करण्याचा हक्क कोणी दिला आहे. माझे चित्रपट तुम्ही प्रेक्षक म्हणून पाहता. तुम्हाला तो चित्रपट कसा वाटला, हे सांगणं तुमचा हक्क आहे. तुम्ही मला क्रिएटीव्हली क्रिटीसाईज केलंत तर माझं काहीही म्हणणं नाही. कारण मी तुमच्या प्रतिक्रियांचा आदर करतो." (Marathi Film)
"पण सोशल मीडियावर मी एखादी पोस्ट टाकल्यानंतर माझ्या परिवाराला बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. जर मला असं काही आढळलं तर, मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून त्याला कानफटवेन. माझ्या कामाबद्दल दिलेल्या प्रतिक्रियांचा मी नेहमीच आदर करतो. पण वैयक्तिक टिप्पणी करू नका. मी तुमच्यावर केव्हा वैयक्तिक टिप्पणी केली आहे का ? एकदा एका युजरने माझ्या मुलीविषयी भीषण कमेंट केली होती. मी शोधुन त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. ज्यावेळी आक्षेपार्ह्य कमेंट करणाऱ्यांवर कायदा जेव्हा तयार होईल, त्यावेळीच हे सर्व संपेल. " असं महेश मांजरेकर मुलाखतीत म्हणाले होते. (Trolled)
सत्य- सई फिल्म्स आणि स्कायलिंक एन्टरटेनमेंट प्रस्तुत 'जुनं फर्निचर' चे यतिन जाधव निर्माते आहेत. 'जुनं फर्निचर'ची कथा, पटकथा, संवाद महेश वामन मांजरेकर यांनी लिहिले असून यात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.