Mrunal Dusanis: 'ती आमच्यासाठी आशीर्वाद आहे...' मृणाल दुसानिसने सांगितला लेकीच्या नावाचा अर्थ

Mrunal Dusanis Baby Girl Name Meaning: मराठमोळी अभिनेत्री मृणाल दुसानिस सध्या चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. मृणाल दुसानिस गेल्या ४ वर्षांपासून नवऱ्यासोबत अमेरिकेत राहत होती. मृणाल काही दिवसांपूर्वीच भारतात परतली आहे.
Mrunal Dusanis
Mrunal DusanisSaam Tv

मराठमोळी अभिनेत्री मृणाल दुसानिस सध्या चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. मृणाल दुसानिस गेल्या ४ वर्षांपासून नवऱ्यासोबत अमेरिकेत राहत होती. मृणाल काही दिवसांपूर्वीच भारतात परतली आहे. मृणालला २ वर्षांची मूलगी आहे. मृणालने नुकत्याच एका मुलाखतीत लेकीच्या नावाचा अर्थ सांगितला आहे.

मृणाल दुसानिस टीव्ही इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री होती. मृणालने २०१६ साली नीरज मोरेशी लग्नगाठ बांधली. तो अमेरिकेमध्येच स्थायिक होता. त्यानंतर काही वर्षांनी मृणालनेही अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. मृणालच्या लेकीचं नाव नुर्वी असे आहे. मृणालने नुकत्याच मुलाखतीत तिच्या नावाचा अर्थ सांगितला आहे. (Mrunal Dusanis Baby Girl Name Meaning)

मृणालने एका मुलाखतीत नुर्वी नावाचा अर्थ सांगितला आहे. मृणाल म्हणाली, 'नुर्वी म्हणदे लक्ष्मी. मी कुठेतरी नुर्वी नावाचा अर्थ आशीर्वाद असा आहे. आम्ही आर्शीर्वाद या अर्थाने नुर्वी नाव ठेवले. आमच्या आयुष्यात ती आशीर्वाद म्हणूनच आली आहे. म्हणून आम्ही तिचे नाव नुर्वी ठेवले आहे'.

'२४ मार्चला नुर्वी दोन वर्षांची झाली. तिला मालिकांविषयी जास्त काही कळत नाही. मी तिला माझ्या मालिका दाखवते. 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' मालिकेचं गाणं ऐकून ती नाचायला लागते. हळूहळू तिला आमच्या कामाबद्दल समजेल', असंही मृणालने सांगितलं आहे.

Mrunal Dusanis
Supriya pilgaonkar Post: 'जहांगिर, तुला...', चिन्मय मांडलेकरला पाठिंबा देण्यासाठी सुप्रिया पिळगांवकर यांची पोस्ट

मृणाल आता कायमची महाराष्ट्रात स्थायिक झाली आहे. मृणालचा नवरा नीरजने भारतात बदली करुन घेतली आहे. त्यामुळे ती आता कायमची मायदेशात राहणार आहे. मृणाल 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'तू तिथे मी', 'सुखांच्या सरींना हे मन बावरे', या मालिकांमध्ये काम केले आहे.

Mrunal Dusanis
Rashi Khanna: वेट ट्रेनिंगपासून ते डाएटपर्यंत राशी खन्नाने 'अरनमानाई 4' मधल्या गाण्यासाठी अशी केली खास मेहनत !

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com