Rashi Khanna: वेट ट्रेनिंगपासून ते डाएटपर्यंत राशी खन्नाने 'अरनमानाई 4' मधल्या गाण्यासाठी अशी केली खास मेहनत !

Rashi Khanna New Song: टॉलिवूड आणि बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे राशी खन्ना. राशी नेहमीच आपल्या सुंदर अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते. अभिनेत्री राशि खन्ना हिने तिच्या आगामी तमिळ चित्रपट 'अरनमनाई 4' मधील 'अचाचो' गाण्यात खूप सुंदर दिसत आहे.
Rashi Khanna
Rashi KhannaSaam Tv

टॉलिवूड आणि बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे राशी खन्ना. राशी नेहमीच आपल्या सुंदर अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते. अभिनेत्री राशि खन्ना हिने तिच्या आगामी तमिळ चित्रपट 'अरनमनाई 4' मधील 'अचाचो' गाण्यात खूप सुंदर दिसत आहे. तिच्या या गाण्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. तिने या गाण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. टोन्ड बॉडी करण्यासाठी राशी ने खास डाएट देखील फॉलो केल्याचं कळतंय.

अभिनेत्रींना फिट राहणे खूप महत्त्वाचे असते. आपल्या बॉडीची काळजी घेण्यासाठी त्या वर्कआउट, डाएट, मेडिटेशन करत असतात. फिटनेससाठी कोणताही शॉर्टकट नसतो असं राशीने सांगितले आहे. राशी म्हणाली " मी या गाण्यासाठी खास कष्ट घेतेले आहेत. 12 ते 16 तासांच्या शूटिंगच्या दिवसातही मी माझ्या वर्कआउटसाठी वेळ काढते. रोज नियमित व्यायाम करून डाएट पाळून मी या गाण्यासाठी तयार झाली आहे. अगदी रविवार च्या चीट डे साठी सुद्धा निरोगी आहार ठेवून मी या गाण्यासाठी टोन्ड बॉडी मिळवण्यासाठी मेहनत घेतली आहे "

तिच्या कमाबद्दलच्या या गोष्टीचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. याआधी ‘मद्रास कॅफे’ आणि " योद्धा " सारख्या चित्रपटांमध्ये तिच्या दमदार अभिनयासाठी प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळवणारी ही अभिनेत्री हॉरर-कॉमेडी ‘अरनमानाई 4’ मध्ये कमालीची भूमिका साकारणार आहे.

Rashi Khanna
Supriya pilgaonkar Post: 'जहांगिर, तुला...', चिन्मय मांडलेकरला पाठिंबा देण्यासाठी सुप्रिया पिळगांवकर यांची पोस्ट

राशी आगामी 'द साबरमती रिपोर्ट' मध्ये ती विक्रांत मॅसीसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. दोन्ही कलाकार पत्रकारांच्या भूमिकेत दिसणारा हा चित्रपट 2 ऑगस्ट, 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. राशी हा हिंदी चित्रपट ‘TME’ आणि तेलुगु चित्रपट ‘तेलुसू काडा’ प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे.

Rashi Khanna
Vicky kaushal: 'छावा' चित्रपटाच्या सेटवरून विकी कौशलचा फोटो लीक; जबरदस्त लूक पाहून चाहते चकीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com