Workout Skincare : वर्कआउट करताना या चुका करु नका, त्वचेवर होईल गंभीर परिणाम; वेळीच घ्या काळजी

Beauty Mistakes During Workout : चुकीच्या वर्कआउट पद्धतीमुळे आपल्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही देखील वर्कआउट करताना काही चुका करत असाल तर वेळीच काळजी घ्या.
Workout Skincare, Beauty Mistakes During Workout
Workout Skincare, Beauty Mistakes During WorkoutSaam Tv

Skin care Tips :

बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्याला अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. स्वत:ला निरोगी ठेवण्यासोबत चांगला आहार घेणे हे देखील महत्त्वाचे आहे.

अनेकजण निरोगी राहण्यासाठी व्यायाम करतात तर काहीजण जीममध्ये जातात. जीममध्ये वर्कआउट करताना अधिक मेहनत घेतली जाते. परंतु, चुकीच्या वर्कआउट पद्धतीमुळे आपल्या त्वचेवर (Skin) परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही देखील वर्कआउट करताना काही चुका करत असाल तर वेळीच (Care) काळजी घ्या.

1. चेहऱ्याला सतत हात लावणे

जीममध्ये वर्कआउट करताना अनेकदा आपण चेहऱ्याला वारंवार स्पर्श करतो. घाम पुसण्यासाठी हातांचा वापर करतात. परंतु, असे केल्याने त्वचेचे नुकसान होते.

Workout Skincare, Beauty Mistakes During Workout
Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी मध ठरतोय गुणकारी, फक्त 'अशा' पद्धतीने करा वापर

वर्कआउट करताना वारंवार चेहऱ्याला स्पर्श केल्याने हातावरील घाण चेहऱ्यावर जमा होते. ज्यामुळे मुरुम आणि त्वचेच्या इतर समस्या उद्भवू शकतात. बरेच लोक जीममध्ये एकच मशीन वापरतात ज्यामुळे बरेच जंतू संक्रमित होतात.

जेव्हा तुम्ही जीममधील इतर उपकरणांना स्पर्श करता तेव्हा ते जंतू तुमच्या हातावर येतात. नंतर ते तुमच्या त्वचेवर येऊ शकतात. यासाठी घाम पुसण्यासाठी टॉवेलचा वापर करा.

2. व्यायाम करताना मेकअप नको

अनेक लोक आहेत जे मेकअप करुन जिममध्ये जातात. सोशल मीडियावर रील तयार करण्यासाठी बरेच लोक मेकअप करुन वर्कआउट करतात. जे त्वचेसाठी हानिकारक आहे. जेव्हा तुम्ही वर्कआउट करता तेव्हा तुमच्या शरीरातून घाम बाहेर पडतो. जो त्वचेच्या छिद्रांमधून बाहेर पडणारा असतो. मेकअपमुळे छिद्रे ब्लॉक होतात आणि पुरळ येऊ शकतात.

Workout Skincare, Beauty Mistakes During Workout
Summer Food : उन्हाळ्यात या पदार्थांचे अतिसेवन ठरु शकते आरोग्याला हानिकारक, वेळीच खाणे टाळा!

3. केस घट्ट बांधू नका

व्यायाम करताना केस घट्ट बांधणे चुकीचे ठरु शकते. अनेक केस घट्ट बांधल्यामुळे ते तुटतात. ज्यामुळे आपल्याला डोकेदुखीचा त्रास उद्भवू लागतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com