Summer Food : उन्हाळ्यात या पदार्थांचे अतिसेवन ठरु शकते आरोग्याला हानिकारक, वेळीच खाणे टाळा!

Summer Diet Plan : उन्हाळा सुरु झाला की, आपण शरीराची काळजी घेतो. अशावेळी शरीराला गारवा देणारे पदार्थ आपण आवडीने खातो. या काळात डिहायड्रेशनची समस्या अधिक प्रमाणात वाढते.
Summer Food, Summer Diet Plan
Summer Food, Summer Diet Plan Saam tv

Food You Must Avoid In Summer :

उन्हाळा सुरु झाला की, आपण शरीराची काळजी घेतो. अशावेळी शरीराला गारवा देणारे पदार्थ आपण आवडीने खातो. या काळात डिहायड्रेशनची समस्या अधिक प्रमाणात वाढते.

वाढत्या तापमानामुळे आपल्याला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाळ्यात (Summer Season) शरीर थंड ठेवण्यासाठी फळे, लस्सी, ज्यूस, लिंबूपाणी, नारळपाणी, आइस्क्रीम, कोल्ड्रिंक्स इत्यादी थंड पदार्थांचे सेवन करतो. यामुळे शरीराला थंडावा तर मिळतोच पण यात असे काही पदार्थ आहेत जे शरीराला उष्णता देखील देतात.

उन्हाळ्यात याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला हानी पोहोचते. अशावेळी आपल्याला अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. जाणून घेऊया उन्हाळ्यात कोणत्या पदार्थांचे (Food) सेवन अधिक प्रमाणात करु नये.

1. पालक

पालकमध्ये जस्त, सेलेनियम आणि लोहसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेली भाजी उन्हाळयात जास्त प्रमाणात खाणे टाळावे. यामुळे शरीरातील उष्णता वाढते.

Summer Food, Summer Diet Plan
Summer Care Tips : उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलं खेळायला घराबाहेर जाताय? कशी घ्याल काळजी?

2. आंबा

उन्हाळ्यात आंब्याचा मौसम असतो. परंतु, अतिप्रमाणात आंबे खाणे आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. आंबे खाल्ल्याने पचायला वेळ लागतो. यामुळे शरीराचे तापमानही वाढू शकतो. याचे सेवन केल्याने चेहऱ्यावर मुरुमही येऊ शकते.

3. अंडी

अंड्यांमध्ये (egg) प्रथिने अधिक असतात. याचे सेवन केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. उन्हाळ्यात याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो.

Summer Food, Summer Diet Plan
Summer Hair Care : उन्हाळ्यात केस चिकट होतात, तुटतात? कशी घ्याल काळजी? या सोप्या टिप्स फॉलो करा

4. आले

आल्यामध्ये उष्णता अधिक प्रमाणात असते. उन्हाळ्यात याच्या सेवनाने पोटात उष्णता वाढते. त्यामुळे याचे संतुलित प्रमाणात सेवन करायला हवे.

5. शेंगदाणे

शेंगदाणे शरीरातील चयापचय गतिमान करतात. ज्यामुळे रक्त परिसंचरण वाढते. उन्हाळ्यात याचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता वाढते. तसेच पित्ताचा त्रासही होतो.

6. बदाम

बदाम किंवा इतर ड्रायफ्रूट्स शरीरासाठी उष्ण असतात. उन्हाळ्यात याचे सेवन केल्याने अपचनाचा त्रास वाढतो. यासाठी प्रमाणात खावे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com