AUS vs AFG: क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय! अफगाणिस्तानविरुद्धची मालिका खेळण्यास नकार; वाचा कारण

Australia vs Afghanistan T20 Series: ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा १४ महिन्यांपूर्वी केलेल्या कृत्याची पुनरावृत्ती केली आहे. १४ महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्ध मालिका खेळण्यासाठी नकार दिला होता
Cricket australia calls off australia vs afghanistan T20I Series know the reason
Cricket australia calls off australia vs afghanistan T20I Series know the reason yandex

Cricket Australia Calls Off Series With Afghanistan:

ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा १४ महिन्यांपूर्वी केलेल्या कृत्याची पुनरावृत्ती केली आहे. १४ महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्ध मालिका खेळण्यासाठी नकार दिला होता.यावेळी ही ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्धची मालिका खेळण्यास नकार कळवला आहे. काय आहे कारण? जाणून घ्या.

अफगाणिस्तानचा संघ सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करतोय. मात्र सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाने ही मालिका खेळण्यास नकार दिला आहे. फरक इतकाच आहे की, गतवर्षी वनडे मालिका होती आणि यावेळी टी-२० मालिका आहे. मात्र कारण तेच आहे. अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये येत्या ऑगस्ट महिन्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका होणार होती. जर या मालिकेसाठी हिरवं कंदील दाखवलं असतं तर ही मालिका यु्एईमध्ये खेळवले जाणार होते. (Cricket news in marathi)

Cricket australia calls off australia vs afghanistan T20I Series know the reason
IPL 2024: रोहित-हार्दिकमध्ये का रे दुरावा? व्हायरल फोटोमुळे दोघांमध्ये बिनसल्याची चर्चा

काय आहे कारण?

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नेहमीच महिला खेळाडूंना पुढे जाण्याची प्रेरणा दिली आहे. मात्र अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर महिलांना कुठल्याही गोष्टीत सहभागी होण्याचं स्वातंत्र्य नाही. तालिबानच्या या वृत्तीने क्रिकेट ऑस्ट्रेलिया दुखावले गेले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Cricket australia calls off australia vs afghanistan T20I Series know the reason
Suryakumar Yadav Heartbreak Story: सूर्यकुमार यादवचा पुन्हा एकदा हार्टब्रेक! नेमकं कारण काय? जाणून घ्या

ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्धची मालिका खेळण्यासाठी नकार देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ३ वेळेस क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पाठ फिरवली आहे. सर्वात आधी २०२१ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये एकमेव कसोटी सामना होणार होता.

होबार्टच्या मैदानावर होणारा हा सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाने नकार कळवला होता. त्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये होणारी वनडे मालिका आणि आता टी -२० मालिका खेळण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नकार दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com