अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त पुनरागमन करत १४ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला. आयर्लंडविरुद्धात झालेल्या सामन्यात त्याने विक्रम केलाय. शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात राशिद खानने ४ ओव्हरच्या स्पेलमध्ये १९ धावा देत ३ विकेट घेतल्या. (Latest News)
यासह राशिद खानने एक अनोखी कामगिरी केली. अफगाणिस्तानचा कर्णधार म्हणून T20आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा विक्रम राशिद खानच्या नावावर आहे. राशिद खानने नवरोज मंगलचा विक्रमही मोडला. आधी अफगाणिस्तानचा कर्णधार म्हणून टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करण्याचा विक्रम नवरोज मंगल यांच्या नावावर होता. मंगलने फेब्रुवारी २०१० मध्ये आयर्लंडच्याविरोधात वर्ल्ड टी२० पात्रता सामन्यात ४ षटकात २३ धावा देत ३ विकेट घेतल्या होत्या. १४ वर्षानंतर आता राशिद खानने हा विक्रम केलाय.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
T20I मध्ये अफगाणिस्तानच्या कर्णधारांची सर्वोत्तम गोलंदाजी
राशिद खानविरुद्ध आयर्लंड - शारजहा (२०२४ ) ४-०-१९-३
नवरोज मंगल विरुद्ध आयर्लंड दुबई (२०१० ) ४-०-२३-४
गुलबदीन नईब विरुद्ध श्रीलंका - हांगझू (२०२३) ४-०-२८-३
मोहम्मद नबी विरुद्ध स्कॉटलंड - शारजाह (२०१३) ४-०-१२-२
मोहम्मद नबी विरुद्ध श्रीलंका -दुबई (२०२२) ४-०-१४
दरम्यान पहिल्या टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात अफगाणिस्तानला आयर्लंडकडून ३८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अफगाणिस्तानचा संघ ३ सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. शारजाह येथे झालेल्या सामन्यात आयर्लंडने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ६ गडी गमावून १४९ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ अवघ्या १८.४ षटक खेळू शकला. सर्वबाद होत अफगाणिस्तानने १११ धावा केल्या. दोन्ही संघांमधील दुसरा सामना रविवारी होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.