IND Vs AUS Test Series : भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेबाबत मोठी अपडेट

India vs Australia Test Sereis Venues: भारतीय संघासाठी २०२४ वर्ष हे अतिशय महत्वाचं असणार आहे. कारण यावर्षी भारतीय संघाला टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा खेळायची आहे. त्यानंतर भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे
big update on india vs australia test series venues announced for the series
big update on india vs australia test series venues announced for the seriessaam tv news

IND vs AUS Test Series Venues Latest Updates:

भारतीय संघासाठी २०२४ वर्ष हे अतिशय महत्वाचं असणार आहे. कारण यावर्षी भारतीय संघाला टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा खेळायची आहे. त्यानंतर भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचं लक्ष ऑस्ट्रेलियात मालिका विजयाची हॅट्रिक करण्यावर असणार आहे. दरम्यान या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने ठिकाणांची घोषणा केली आहे.

कुठे रंगणार भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील सामने?

ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना पर्थमध्ये रंगणार आहे. तर दुसरा कसोटी सामना हा डे-नाईट सामना असणार आहे. हा सामना अॅडिलेडच्या मैदानावर रंगणार आहे. मालिकेतील तिसरा सामना गाबाच्या मैदानावर रंगणार आहे. तर मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर रंगणार आहे.

हा सामना २६ डिसेंबर रोजी रंगणार आहे. हा बॉक्सिंग डे कसोटी सामना मेलबर्नमध्ये खेळला जाणार आहे. तर मालिकेतील शेवटचा सामना २०२५ च्या सुरुवातीला खेळला जाणार आहे. दरम्यान या मालिकेचं वेळापकत्रक अजून समोर आलेलं नाही. (Cricket news in marathi)

big update on india vs australia test series venues announced for the series
WPL Final 2024: 'आता ए साला कप नामदू म्हणायचं...',RCB च्या ऐतिहासिक विजयानंतर स्मृती मंधानाचा फॅन्सला खास मेसेज

भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची मालिका..

ऑस्ट्रेलिया दौरा हा भारतीय संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. सध्या भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. मालिका ऑस्ट्रेलियात असल्याने ऑस्ट्रेलियाचं पारडं जड असणार आहे. ही मालिका जर ड्रॉ झाली किंवा भारतीय संघाचा पराभव झाला तर हे भारतीय संघाला महागात पडू शकतं.

big update on india vs australia test series venues announced for the series
WPL Prize Money: WPL विजेत्या RCB वर कोट्यवधींचा वर्षाव! उपविजेत्या अन् ऑरेंज-पर्पल कॅप विनर्सला किती रक्कम मिळाली?

कारण ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर तिसऱ्या न्यूझीलंडचा संघ आहे. टॉप २ मध्ये टीकून राहण्यासाठी तिन्ही संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. त्यामुळे ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने निर्णायक ठरणार यात काहीच शंका नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com