Team India News: रोहितचा तो निर्णय ठरला ऐतिहासिक! भारतीय क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदाच घडलं असं

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात असं काही घडलं आहे जे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच घडलं आहे.
devdutt padikkal to sarfaraz 5 indian player to debut in india vs england test series team india record
devdutt padikkal to sarfaraz 5 indian player to debut in india vs england test series team india recordsaam tv news

India vs England 5th Test, Team India Record:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील सुरुवातीच्या ४ सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर, इंग्लंडने पहिलाच सामना जिंकत १-० ची आघाडी घेतली होती. त्यानंतर पुढील तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारत ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान या मालिकेत भारतीय संघात ५ खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेली कसोटी मालिका ऐतिहासिक ठरली आहे. कारण या मालिकेत असं काही घडलं आहे जे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच घडलं आहे. या मालिकेत भारतीय संघाकडून ५ खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. हे केवळ दुसऱ्यांदा घडलं आहे. यापूर्वी २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाकडून ५ खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती. (Cricket news in marathi)

devdutt padikkal to sarfaraz 5 indian player to debut in india vs england test series team india record
IND vs ENG 5th Test, Toss Update: प्रतिष्ठा राखण्यासाठी इंग्लंडचा संघ मैदानात! टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग ११

या खेळाडूंनी केलं होतं पदार्पण...

भारतीय संघ २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली होती. या मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारतीय संघाने शानदार विजय मिळवला होता. या मालिकेत शुभमन गिल, टी नटराजन, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनीला पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती.

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत या खेळाडूंना मिळाली संधी..

इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतही ५ युवा खेळाडूंना भारतीय कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. विशाखापट्टनममध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत रजत पाटीदारला पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती.

त्यानंतर सरफराज खान आणि ध्रुव जुरेलला संघात पदार्पण करण्याची संधी देण्यात आली. मालिकेतील चौथ्या कसोटीत आकाशदीपला पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती. आता शेवटच्या सामन्यात देवदत्त पडिक्कलला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे.

devdutt padikkal to sarfaraz 5 indian player to debut in india vs england test series team india record
IND vs ENG 5th Test: रोहित शर्माचं टेन्शन वाढलं! अखेरच्या कसोटीच्या एक दिवसाआधी नेमकं काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com