भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना धरमशालेच्या मैदानावर रंगणार आहे. या मालिकेत भारतीय संघ ३-१ ने आघाडीवर आहे. मात्र अंतिम सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माची डोकेदुखी कमी झालेली नाही. कारण या सामन्यान भारतीय संघ ३ वेगवान गोलंदाजांसह उतरणार की ३ फिरकी गोलंदाजांसह, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
यापूर्वी झालेल्या ४ कसोटी सामन्यांमध्ये रोहितने २ वेगवान तर ३ फिरकी गोलंदाजांना संघात स्थान दिलं होतं. मात्र हा सामना धरमशालेच्या मैदानावर रंगणार आहे. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठीही फायदेशीर ठरते. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना गती आणि उसळी मिळते. काही दिवसांपूर्वी याच मैदानावर दिल्ली विरुद्ध हिमाचल प्रदेश या दोन्ही संघांमध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सामना पार पडला होता. या सामन्यात ४ दिवसात ३६ विकेट्स पडल्या. हे सर्व विकेट्स वेगवान गोलंदाजांनी घेतल्या होत्या.
कसा राहिलाय गोलंदाजांचा रेकॉर्ड?
धरमशालेच्या मैदानावर रणजी ट्रॉफी स्पर्धेतील या हंगामातील ४ सामने खेळले गेले आहेत. या ४ सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजांनी ८१४ षटकं गोलंदाजी केली. यादरम्यान १२२ विकेट्स पडल्या. तर फिरकी गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर, १२२.२ षटकात केवळ ७ विकेट्स पडल्या आहेत.
हा रेकॉर्ड पाहता रोहित शर्मा ३ फिरकी गोलंदाजांना खेळवण्याची रिस्क घेणार नाही. या सामन्यातून कुलदीप यादवला विश्रांती दिली जाऊ शकते. तर आर अश्विन आणि रविंद्र जडेजा हे दोघेही फिरकी गोलंदाजांच्या भुमिकेत असतील. तर जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज या तिन्ही वेगवान गोलंदाजांना संघात स्थान दिले जाऊ शकते.
तसेच या मैदानावरील आंतरराष्ट्रीय सामन्यातील रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, २०१७ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये एकमेव कसोटी सामना पार पडला होता. या सामन्यात फिरकी गोलंदाजांनी ३० पैकी १८ विकेट्स घेतल्या होत्या. त्या सामन्यात कुलदीप यादवने पदार्पण केलं होतं. या डावात कुलदीप यादवने ४ गडी बाद केले होते. तर नॅथन लायनने ५ गडी बाद केले. तर आर अश्विन आणि रविंद्र जडेजाने संयुक्तरित्या ६-६ गडी बाद केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.