IND vs ENG Playing XI Prediction: धरमशाला कसोटीत कोणत्या ११ खेळाडूंना मिळणार स्थान?

India vs England 5th Test Playing XI Prediction: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना धरमशालेच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११ जाणून घ्या.
Playing XI Prediction For India vs England 5th Test Match
Playing XI Prediction For India vs England 5th Test MatchX
Published On

India vs England 5th Test, Playing XI Prediction:

धरमशालेच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना रंगणार आहे. या मालिकेत पहिल्या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पुढील तिन्ही सामने जिंकत भारतीय संघाने ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे.

हा सामना जिंकून भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आपली स्थिती आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दुसरीकडे मालिका गमावलेला इंग्लंडचा संघ शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

प्लेइंग ११ मध्ये होणार बदल?

धरमशालेत होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यासाठी जसप्रीत बुमराहचं भारतीय संघात कमबॅक झालं आहे. तिसरा सामना झाल्यानंतर त्याला चौथ्या सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती. आता पाचव्या कसोटी सामन्यात त्याची प्लेइंग ११ मध्ये एन्ट्री होणार आहे.

तर रजत पाटीदारच्या खेळण्यावर टांगती तलवार आहे. त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी दिली गेली, मात्र तो या संधीचा पुरेपूर फायदा घेऊ शकलेला नाही. तर दुसरीकडे केएल राहुल दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला आहे. तो लंडनहून तर परतला आहे. मात्र तो या सामन्यात खेळताना दिसून येणार नाही.

Playing XI Prediction For India vs England 5th Test Match
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! संघातील दिग्गज गोलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती

भारतीय संघाकडून गेल्या सामन्यात आकाश दीपने शानदार गोलंदाजी केली होती. चौथ्या सामन्यातील पहिल्याच डावात त्याने ३ महत्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. आता बुमराह आणि मोहम्मद सिराज हे दोघेही गोलंदाज संघात परतले आहेत. त्यामुळे कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Cricket news in marathi)

Playing XI Prediction For India vs England 5th Test Match
IND vs ENG 5th Test: इंग्लंडविरुद्ध ३- १ ने आघाडीवर असूनही शेवटचा सामना टीम इंडियासाठी महत्वाचा का? हे आहे कारण

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सरफराज खान, रविंद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

या सामन्यासाठी अशी असू शकते इंग्लंडची प्लेइंग ११:

झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, शोएब बशीर, जेम्स एंडरसन.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com